शिवप्रहार न्यूज- गुटखा पकडला; दोघांना अटक! महिला पोलिसास आरोपीच्या भावाकडून मारहाण!!
गुटखा पकडला; दोघांना अटक! महिला पोलिसास आरोपीच्या भावाकडून मारहाण!!
संगमनेर /नगर (शिवप्रहार न्यूज)- बऱ्याच दिवसानंतर अन्न व औषध प्रशासनाने संगमनेर शहरात हजारो रुपयांचा हिरा गुटखा आरडीएम पान मसाला, विमल पान मसाला, रॉयल तंबाखू साठा विक्रीसाठी ठेवलेला पकडला. महाराष्ट्रात गुटखा विक्रीस बंदी असतानाही हा हजारो रुपयांचा गुटखा मिळून आला इहे. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप परशुराम पवार यांनी संगमनेर शहर पोलीसात फिर्याद दिल्यावरून आरोपी फईम बालम पठाण, मुबीन खलील शेख व आफ्रिदी यांच्याविरुद्ध अन्नसुरक्षा मानके कायदा 2006 चे कलम तसेच 328 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फईम पठाण व मुबीन शेख या दोघांना संगमनेर शहर पोलिसांनी अटक केली असून पोनि.भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई.जाणे हे पुढील तपास करीत आहे. जिल्हाभर गुटखा विक्री होत आहे हे विशेष होय.
तर आमचा नगरचा प्रतिनिधी कळवतो जामखेड पोलीस स्टेशन परिसरात लॉकप गार्ड असलेल्या ठीकाणी ड्युटी बजावत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी शिंदे यांना जेलमध्ये असलेल्या एका आरोपीचा भाऊ संदीप बबन वाघमारे राहणार-जामखेड व त्याच्यासोबतचा एफ जण यांना लॉकप मध्ये येऊ नका असे म्हटल्याचा राग आल्याने आरोपी संदीप वाघमारे म्हणाला मला परमिशन घ्यायची नसते तुझ्या साहेबाला फोन लाव तुझा साहेब कोण आहे? तू काय झाशीची राणी आहे का?असे म्हणून लॉकप गार्ड मध्ये येऊन महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा गाळा करून तोंडावर, डोक्यात फायटी मारून तेथे पडलेल्या लोखंडी पाईपने एलसीडी, पाण्याचा जार, बॅटरी, खुर्ची फोडून नुकसान करून पळून गेला. याप्रकरणी महिला पोलीस कर्मचारी शिंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी संदीप बबन वाघमारे व त्याचा सोबतचा इसम अशा दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोनि.गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.बडे हे पुढील तपास करीत आहे.