शिवप्रहार न्यूज - संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्ती धाम गोशाळावरील कार्यवाही रहित करून सहाय्य करण्याकरिता ना.विखे पा.यांना निवेदन…

शिवप्रहार न्यूज - संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्ती धाम गोशाळावरील कार्यवाही रहित करून सहाय्य करण्याकरिता ना.विखे पा.यांना निवेदन…

संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्ती धाम गोशाळावरील कार्यवाही रहित करून सहाय्य करण्याकरिता ना.विखे पा.यांना निवेदन…

नगर -

श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्ती धाम सेवा संस्थान गोशाळाचे संस्थापक, अध्यक्ष, विश्वस्त ह भ प भगवान महाराज कोकरे हे गोप्रेमी असून हिंदुत्वाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांच्या गोशाळेत 1000 पेक्षा जास्त गोधनाची सेवा ते करीत आहेत. कत्तलखानातील गोधन वाचून त्यांना चोर, गोहत्यारे यांच्या तावडीतून सोडवून आणून त्यांची ते सेवा करत आहेत.     

      मुंबई- गोवा- बंगलोर हा हायवे रस्ता त्यांच्या गोशाळेच्या जवळच असल्याने गाय, बैल यांचे अपघात झालेली गोधने ही ते या गोशाळेत आणत असतात तसेच शेतकऱ्यांना सांभाळता येत नसलेली गाय, बैल, वासरेही ते या गोशाळेत आणून त्यांची मनोभावे सेवा करीत आहेत. 

2016 ते 2017 मध्ये महाराष्ट्र शासनाने गोवर्धन गोवंश सेवा केंद्र या योजनेअंतर्गत या गोशाळेला एक कोटी अनुदान मंजूर केले त्यातील 75 लाख रुपये त्यांना मिळाले. सरकारच्या या सहकार्यामुळेच ह भ प भगवान महाराज कोकरे हे 2008 साली फक्त चार गोवंशावरून आजमीतीला 1000 हून अधिक गोवंशाची सेवा ते अविरत करत आहेत. सरकारच्या सहकार्याने हे शक्य झाले आहे. मात्र सरकार बदलले व कोरोनाच्या कालखंडात शासनाची कोणतीच मदत या गोशाळेला मिळू शकली नाही. किर्तन, प्रवचने इत्यादी ही बंद असल्याने ह भ प भगवान महाराज यांना हे गोधन वाचवण्यासाठी घरातील दाग दागिनेही विकावे लागले. इतरांकडून कर्ज काढून ही गोसेवा केली व आजवर करीत आहेत. 

     गोसेवा करणारे कामगार, त्यांचे पगार, भोजनाची व्यवस्था, चारा, पाणी, वीज इत्यादी सर्व भार ह भ प भगवान महाराज यांना सहन करावा लागला. हजारो गाईंच्या निवारासाठी गोशाळेचे केलेले बांधकाम उभारलेल्या शेड व येथील स्वच्छता इत्यादी चोख व्यवस्था पाहून अनेकांना शांती, आनंदाचे वातावरण लाभल्याने या गोशाळेला अनेकांनी भेट दिली मात्र याची गोतस्कर, गोधन चोरी करणारे, गोहत्यारे व त्यांचे पाठीराखे यांची पोटदुखी मात्र वाढली. ह भ प भगवान महाराज हे हिंदुत्वाचे कार्य तळमळून करत असल्याने त्यांना रोखण्यासाठी ही गोशाळा कायमस्वरूपी बंद व्हावी यासाठी येनकेन प्रकरण त्रास देत आहेत. गाईंचा चारा जाळून टाकत आहेत यास्तव या गोशाळेला संरक्षण देणे, आर्थिक मदत करणे महत्त्वाचे आहे. ह भ प भगवान महाराज कोकरे यांचे महत्त्व येथे दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. भगवान महाराज हे उत्कृष्ट वक्ते, गायक, गोसेवक व अन्यायाविरुद्ध लढणारे असल्याने स्थानिक राजकीय पुढारी या गोशाळेविषयी अपप्रचार करीत आहेत व सातत्याने अडथळे निर्माण करीत आहेत. 

      आपल्या सरकारने त्यांना 75 लक्ष रुपये देऊन खूप चांगले सहकार्य केले आहे.त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार ! परंतु उर्वरित 25 लक्ष देऊन या गोशाळे मध्ये ज्या काही समस्या आहेत. अडथळे आहेत ते दूर करून या गोसेवेला हातभार लावून कार्य करावे सदरहू कार्य हे पूण्यप्रत असल्याने सरकारने तातडीने लक्ष द्यावे. ह भ प भगवान महाराज हे उत्कृष्ट पशुसंवर्धनाचे कार्य करीत असताना पशुसंवर्धन आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे 67 यांनी पाठवलेल्या पत्रानुसार त्यांच्यावर अनावश्यक कार्यवाही करण्याच्या तयारीत असल्याचे निदर्शनास येत आहे. ही बाब निषेधार्य असून संतांच्या, छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात गोसेवकांवरील अन्याय दूर करून त्यांना संरक्षण द्यावे ही नम्र विनंती आम्ही आपणाकडे करीत आहोत. दिनांक 2/2/2023 पासून ह भ प भगवान महाराज कोकरे व त्यांचे गोसेवक कर्मचारी तसेच राष्ट्रीय वारकरी परिषदेचे उपाध्यक्ष ह भ प अंभोरे महाराज कारभारी इत्यादी उपोषणाला बसले आहेत त्यांना आपल्या पशुसंवर्धन खात्यातर्फे अश्वस्थ करावे. गोशाळेला संरक्षण द्यावे अन्यथा महाराष्ट्रभर असे आंदोलन करावे लागतील परंतु यात सरकारचीच नाचक्की होण्याची शक्यता आहे. असे घडावे हीच विरोधी पक्षातील आमदार श्री भास्कर जाधव यांची मनीषा दिसत आहे. तेव्हा मंत्री महोदय, महाराष्ट्र सरकारने अखंड सावधानता बाळगावी. ही नम्र विनंती.!!राम कृष्ण हरी!! 

                    आपले नम्र

ह भ प अंभोरे महाराज कारभारी उपाध्यक्ष राष्ट्रीय वारकरी परिषद

ह भ प वेनुनाथ महाराज विखे संपर्कप्रमुख महाराष्ट्र राज्य

ह.भ.प.विठ्ठल महाराज अभंग सेवा विभाग प्रमुख राष्ट्रीय वारकरी परिषद

अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.