शिवप्रहार न्यूज - विद्यार्थांचे ज्ञान विकसीत करण्यासाठी फनलॅन्ड कार्यक्रम उपयुक्तः एसपी राकेश ओला

विद्यार्थांचे ज्ञान विकसीत करण्यासाठी फनलॅन्ड कार्यक्रम उपयुक्तः एसपी राकेश ओला
नगर(शिवप्रहार न्युज)- शहराच्या सावेडी विभागातील वडगांव गुप्ता रोड येथील आठरे पाटील पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेच्या पंचवीस एकराच्या विस्तीर्ण प्रांगणात फनलॅन्ड कार्निवल कार्यक्रम दोन दिवस सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यत आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हयाचे पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्व विकास, व्यवहार ज्ञान, संभाषण, चातुर्य विकसित करण्याबरोबरच त्यांना आर्थिक देवाण-घेवाण शिकण्यासाठी फनलॅन्ड कार्यक्रम उपयुक्त ठरेल असे सांगितले.
नगर जिल्हयातील सर्वात मोठया या कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक यांच्यावतीने विविध नृत्य, संगीत, मनोरंजक खेळ इत्यादींचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नामांकित बाहय विक्रेत्यांकडून विविध खाद्य पदार्थांचे स्टॉलही लावण्यात आले होते. या कार्निवलमध्ये नृत्य, संगीत, अश्वरोहण, जलतरण, बलुन शूटिंग, ट्रॅम्पोलिन, आर्चरी, झॉर्डिंग, बंजी जंम्पिंग, ॲन्ग्री बर्ड, व्हिल ऑफ फॉर्च्यून, बोट रेसिंग, बॉल इन क्लाऊन, डिस्क ड्रॉप, अंडर ओव्हर लकी सेव्हन, या मनोरंजक खेळांबरोबरच मॅजिक शो, पपेट शो यासारख्या विविध मनोरंजक, आकर्षक व नाविन्यपूर्ण खेळांचे आयोजन करण्यात आले होते. स्वादिष्ट व रुचकर शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थाचे स्टॉलही बाहय विक्रेत्यांकडून लावण्यात आले होते, त्याचा ही मनमुराद आनंद सर्वाना घेतला. नगर शहरातील सर्व शाळेतील विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा, शिक्षकांचा या कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे पाटील आणि बिग स्टेज प्रोडक्शनच्या संचालिका डॉ.अदिती आठरे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षा ज्योतिताई पिसुटे, विश्वस्त डॉ.अंजली आठरे, पीईओ संजय आठरे पाटील, पोलिस निरीक्षक युवराज आठरे पाटील, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मिनाक्षी बांगर व स्नेहल वाघमारे यांनी केले.