शिवप्रहार न्यूज - वुडलैंड हॉटेल समोर इंडिका कार पलटी...

शिवप्रहार न्यूज - वुडलैंड हॉटेल समोर इंडिका कार पलटी...

वुडलैंड हॉटेल समोर इंडिका कार पलटी...

 श्रीरामपूर - एमआयडीसी परिसरातील बाभळेश्वर रोडवरील वुडलैंड हॉटेल समोर एसटी कार्यशाळे शेजारी काल ०९ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास एक भरधाव वेगाने जाणारी इंडिका विस्टा क्रमांक एमएच 21 वी 6203 हि श्रीरामपूरकडे येत असताना वुडलैंड हॉटेल समोर तीन पलट्या खाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या भिंतीला जाऊन आदळली. अपघातामध्ये विस्टाचा चालक आकाश विघावे हा जखमी झाला आहे.

        त्याला पुढील उपचार कामी तात्काळ पीएमटी,लोणी येथे हलविण्यात आले आहे.यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती.पोलीस प्रशासनाकडून पुढील कार्यवाही चालू झाली आहे.