शिवप्रहार न्यूज- पाटाजवळ महावितरणच्या लोंबकळणाऱ्या तारा जीवघेण्या अवस्थेत...

शिवप्रहार न्यूज- पाटाजवळ महावितरणच्या लोंबकळणाऱ्या तारा जीवघेण्या अवस्थेत...

पाटाजवळ महावितरणच्या लोंबकळणाऱ्या तारा जीवघेण्या अवस्थेत...


श्रीरामपूर-  श्रीरामपूर शहरातील भगतसिंग चौक परिसरातील पाटाच्या कडाला असलेल्या पत्र्याच्या गाळ्यांच्या वरील महावितरणच्या लोंबकळलेल्या अवस्थेतील तारा जीव घेण्या परिस्थितीत लटकताना दिसत आहे.या तारा विजेच्या दुसऱ्या खांबाला चिटकण्याची शक्यता असून त्यामुळे त्या खांबात विद्युत प्रवाह शिरुन एखाद्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू होऊ शकतो.
      याबाबत येथील काही टपरीधारकांनी महावितरणच्या श्री.मिश्रा,श्री निकम व वायरमन श्री.ताके यांना कळवले आहे.परंतु त्यावर महावितरणने ठोस कार्यवाही केली नाही. या लोखंडी खांबावर एक रबराचा तुकडा ठेवला आहे परंतु त्यामुळे धोका टळलेला नाही.
       जर या तारांचा संपर्क खांबाला झाला तर खांबाखाली असलेल्या पत्र्याच्या टपऱ्यांमध्ये विद्युत प्रवाह शिरून जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे.तसे झाले तर त्याला जबाबदार कोण राहील ?असा सवाल येथील काही टपरीधारकांनी केला आहे.