शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूरात कत्तलीसाठी आणलेले गाया, गो-हे पकडले

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपूरात कत्तलीसाठी आणलेले गाया, गो-हे पकडले

श्रीरामपूरात कत्तलीसाठी आणलेले गाया, गो-हे पकडले

श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं.2 मध्ये कत्तलीसाठी आणलेल्या 9 गोवंशीय जातीच्या गाया व गो-हे शहर पोलिसांनी पकडले आहेत. त्यांची एकूण किंमत 1 लाख 70 हजार रूपये आहे.

  याबाबत अधिक माहिती अशी की, काल दि.22 मार्च रोजी 12:30 च्या सुमारास श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोनि.हर्षवर्धन गवळी यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी पोहेकॉ.शेख, कारखिले, जाधव, आंधळे यांना वॉर्ड नं.2 परिसरातील बाबरपुरा पाण्याच्या टाकीजवळ याठिकाणी पाठवले. त्याठिकाणी जाऊन पाहणी केली असता सदर ठिकाणी एका बंद खोलीमध्ये 9 गोवंशीय जातीच्या गाई व गोऱ्हे चारापाण्याची व्यवस्था न करता गर्दी करून त्यांना निर्दयतेने कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवल्याचे दिसून आले. त्याबाबत विचारपूस केली असता सदर जनावरे मोहसीन इसाक कुरेशी उर्फ बुंदी, रा.कुरेशी मोहल्ला, वॉर्ड नं.2, श्रीरामपूर याचे असल्याचे समजले. पोलिसांनी 1 लाख 70 हजार रूपयांचे जनावरे पंचनामा करून ताब्यात घेतले आणि मोहसीन इसाक याच्याविरोधात महाराष्ट्र प्राणी कुरेशी संरक्षण अधिनियम 1995 चे सुधारित कायदा 2015 चे कायदा 5, 5 (ब), 9 (अ) सह प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यात प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 चे कलम 11, स.ज.छ. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि.गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.