शिवप्रहार न्यूज- याचना नही अब रण होगा संघर्ष बडा भिषण होगा - भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर…

शिवप्रहार न्यूज- याचना नही अब रण होगा संघर्ष बडा भिषण होगा - भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर…

याचना नही अब रण होगा संघर्ष बडा भिषण होगा - भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर…

शिर्डी- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व धडाडीचे विरोधी पक्षनेते माननीय आमदार देवेंद्रजी फडवणीस साहेब यांना बेकायदेशीर नोटीस बजावून त्यांना अडकवण्याचा हा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे. राज्यातील हे सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहे. राज्य सरकारचे विविध कट-कारस्थान उघड केले म्हणून या आघाडी सरकारने राजकीय आकसापोटी फडणवीस साहेबांना नोटीस पाठवली. संपूर्ण महाराष्ट्र फडवणीस साहेबांच्या मागे उभा आहे सरकारने सूडबुद्धीने फडणवीस साहेबांना खोट्यानाट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न यशस्वी होणार नाही. कोणत्याही कार्यकर्त्यांना या सरकारने अडकविण्याचा डाव रचला तर याचना नही का बरं होगा संघर्ष बडा भिषण होगा असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी केले.

       जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा हे सरकार भ्रष्टाचार करण्यात व्यस्त आहे.धडाडीचे विरोधी पक्षनेते नामदार देवेंद्रजी फडवणीस साहेब यांनी महाविकासआघाडी सरकारमधील मंत्र्यांचे भ्रष्टचार पुराव्यानिशी उघड केले आहे. राजकीय द्वेषापोटी दडपशाही करत राज्यातील सरकारने फडवणीस साहेबांना नोटीस बजावली आहे त्या नोटीसी ची होळी या वेळी करण्यात आली. व जिल्हा उपाध्यक्ष श्री. नितिन कापसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

      तसेच याप्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र गोंदकर, उपाध्यक्ष श्री. नितिन कापसे,श्री. रघुनाथ बोठे, ओबिसी मोर्चा चे जिल्हाध्यक्ष श्री. बाळासाहेब गाडेकर, गणेश कारखान्याचे चेअरमन श्री. मुकुंद सदफळ, बाजार समिती चे चेअरमन श्री. जेजुरकर साहेब, युवा मोर्चा प्रदेश सदस्य श्री. किरण बोराडे,ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्री. सुनिल लोंढे,ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष श्री. स्वानंद रासने, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्री. नरेश सुराणा, जिल्हा सचिव सोमराज कावळे, ओबीसी मोर्चा तालुका युवा अध्यक्ष श्री. जितेंद्र माळवदे, शिर्डी युवा मोर्चा संघटन सरचिटणीस श्री. लखन बेलदार यांसह आदी पदाधिकारी,कार्यकर्ते, ग्रामस्थ व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.