शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरातील प्राचार्य व लिपिक बाईला एक लाख 47 हजार रुपयांची लाच घेताना पकडले....

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरातील प्राचार्य व लिपिक बाईला एक लाख 47 हजार रुपयांची लाच घेताना पकडले....

श्रीरामपुरातील प्राचार्य व लिपिक बाईला एक लाख 47 हजार रुपयांची लाच घेताना पकडले....

श्रीरामपूर - श्रीरामपूर शहराजवळील वडाळा महादेव येथील होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचा प्राचार्य बापूसाहेब बाळासाहेब हरिष्चंद्रे,वय 52 वर्ष,राहणार -मानूर,तालुका -राहुरी ,जिल्हा -नगर व भारती बापूसाहेब इथापे,वय 34 वर्ष,व्यवसाय -लिपिक,होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, वडाळा महादेव,तालुका-श्रीरामपूर. राहणार- निपाणी वडगाव,तालुका.श्रीरामपूर यांना आज दिनांक 12 ऑगस्ट 2021 रोजी एक लाख 47 हजार पाचशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नगर यांनी पकडले आहे.

       या प्रकरणाची अधिक माहिती अशी की,एका 49 वर्षाच्या तक्रारदार पुरुषाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती की,त्याच्या मुलीचे बी.एच.एम.एस. पदवीचे पासिंग सर्टिफिकेट व इंटरंशिप पूर्ण केल्याचे सर्टीफिकीट देण्याकरिता आरोपी प्राचार्य व लिपिक बाई यांनी एक लाख 47 हजार पाचशे रुपयांची मागणी केली होती.

       त्या मागणीप्रमाणे आज 12 ऑगस्ट 2021 रोजी एक लाख 47 हजार पाचशे रुपयांची रक्कम प्राचार्याच्या सांगण्यावरून लिपिक बाईने स्वीकारली.त्यावेळी त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नगर या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.

        याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही चालू आहे.

          प्राचार्य व लिपिक बाईला एवढ्या मोठ्या रकमेची लाच स्वीकारताना पकडल्याने श्रीरामपूर शहर व तालुक्यात मोठी खळबळ माजली आहे.