शिवप्रहार न्यूज - दोन मुलांच्या बापाकडून श्रीरामपूरातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार; राहुरीतही दोन बलात्कार! 2-अटक 2-फरार !!

शिवप्रहार न्यूज  - दोन मुलांच्या बापाकडून श्रीरामपूरातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार; राहुरीतही दोन बलात्कार! 2-अटक 2-फरार !!

दोन मुलांच्या बापाकडून श्रीरामपूरातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार; राहुरीतही दोन बलात्कार! 2-अटक 2-फरार !!

श्रीरामपूर/राहुरी (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेवून तिच्यावर अत्याचार करणाऱ्याला पुणे येथून पोलिसांनी ताब्यात घेतले असून 2 मुलांचा बाप असणाऱ्या आरोपी ताहेर यांच्यावर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  याबाबतची अधिक माहिती अशी की, दि. 19 तारखेला मालुंजा परिसरातून एक 16 'वर्षांची अल्पवयीन मुलगी सकाळी 10 वा. आपल्या राहात्या घरातून बेपत्ता झाली होती. सदर मुलीचा शोध सर्वत्र घेतल्यानंतर ती आढळली नाही म्हणून 20 तारखेला तिच्या घरच्यांनी पोलिसांनी तक्रार दिल्यावरून भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर मुलीचा शोध घेत असताना पोलिसांना समजले की, 2-3 वर्षांपूर्वी सदर मुलीच्या घरचे हे पुण्याला वीट भट्टीवर काम करायला राहत होते. त्याठिकाणी एक टेम्पो चालक ताहेर शेख, वय - 28 याच्याशी या कुटूंबाची ओळख झाली. त्यानंतर सदर मालुंजे येथील कुटूंब पुण्याहून पुन्हा मालुंजा येथे आले. पुणे येथून हा टेम्पो चालक घटना घडली त्यादिवशी 19 तारखेला मालुंजा परिसरात आला होता. सदर मुलीच्या तो संपर्कात होता. त्याने मुलीला फूस लावून, आमीष दाखवून मालुंजा, ता.श्रीरामपूर येथून पुण्याला पळवून नेले. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सदर टेम्पोचालक ताहेर शेख याचा तपास करत सदर अल्पवयीन मुलीसह त्याला ताब्यात घेवून श्रीरामपूरला आणले आहे. सदर आरोपी ताहेर शेख याचे लग्न झालेले असून त्याला दोन मुलं असल्याचे समजते. त्याच्याविरोधात श्रीरामपूर तालुका पोलिसांत बलात्कार केल्याचा भादंवि कलम 376 तसेच अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळ प्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोनि.चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शिंदे हे करीत आहेत.

  तर राहुरी तालुक्यातही दोन बलात्काराच्या घटना घडल्याने खळबळ उडाली असून या प्रकरणी अधिक माहिती अशी देवळाली प्रवरा परिसरात राहणारा आरोपी आकाश वाघचौरे यांने एका विवाहित तरुणीच्या घरी जाऊन मी तुझ्या नवऱ्याचा मित्र असून त्याने तुला व मुलांसाठी वडापाव पाठवले आहे असे म्हणून आरोपी आकाश वाकचौरे विवाहीत तरुणीच्या घरात घुसला आणि तरुणीला धरून बेडवर पाडून तोंड दाबून तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. भरदिवसा ११-३० वाजता हा प्रकार घडला. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपी आकाश वाकचौरे यांच्या विरुद्ध भादवी कलम 376, 452, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी आकाश वाकचौरेला पोलिसांनी अटक केली आहे. राहुरीतील दुसऱ्या घटनेत राहुरी शहरात तनपुरेवाडी येथे राहणारे आरोपी सर्जेराव सूर्यवंशी व पिनू सूर्यवंशी हे दोघे एका 24 वर्षांच्या तरुणीच्या घरी गेले रात्रीच्या वेळी घरात घुसले व तुझ्या नवऱ्याने अत्याचार केला आहे ! त्याचा आम्हाला बदला घ्यायचा ! असे म्हणत पिनू सूर्यवंशी यांने तरुणीवर बळजबरीने बलात्कार केला व धमकी दिली या प्रकरणी आरोपी सर्जेराव सूर्यवंशी, पिनू सूर्यवंशी दोघे-राहणार तनपुरेवाडी, राहुरी यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोनि.डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई.नारेडा व पोसई.बोकील हे पुढील तपास करीत आहे. या घटनेने ओळखीच्या लोकांनी बलात्कार केल्याचे उघड झाले आहे.