शिवप्रहार न्युज - मराठा आरक्षण पुन्हा पेटले; सर्व पक्षीय नेत्यांना भावपूर्ण श्राद्धजलीचे बॅनर बनवून आंदोलन...

शिवप्रहार न्युज - मराठा आरक्षण पुन्हा पेटले; सर्व पक्षीय नेत्यांना भावपूर्ण श्राद्धजलीचे बॅनर बनवून आंदोलन...

मराठा आरक्षण पुन्हा पेटले; सर्व पक्षीय नेत्यांना भावपूर्ण श्राद्धजलीचे बॅनर बनवून आंदोलन...

नेवासा (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे राज्य शासनाने गांभीर्याने लक्ष घातलेले नाही. त्यामुळे मराठा समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. ठिकठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत. आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला असून, आरक्षणाच्या प्रश्‍नाला अग्रक्रम देवून पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागल्यामुळे नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात मराठा क्रांती मोर्चा नगरच्या वतीने 'मराठा आरक्षणाचा मुद्दा पावसाळी अधिवेशनात न लागल्यामुळे सर्व पक्षीय मंञी, खासदार, आमदार यांना भावपूर्ण श्राद्धजली' असा मजकूर असलेले बॅनर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. मराठा क्रांती मार्चाच्या नगर जिल्ह्याच्या वतीने आज बुधवार दि.९ रोजी हे बॅनर व्हायरल करून हे आंदोलन केले आहे. या वेळी मराठा बांधवांनी आक्रोशही व्यक्त केला.

    गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी 40 वर्षांपासून आरक्षणासाठी सकल मराठा समाज संघर्ष करत आहे. सर्वच पक्षांनी सत्ता उपभोगली मात्र, आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावला नाही. यामुळे मराठा समाजात तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे. त्याचा भडका 2016 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून मराठा क्रांती मोर्चाच्या नेतृत्वात उमटला होता. त्यानंतर 58 मुक मोर्चे निघाले. काँग्रेस व भाजप सरकारने आरक्षण दिले. त्रूटी असल्याने तेही सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. आता पुन्हा आयोग नेमून सर्वेक्षण केले जात आहे. सरकारच्या वतीने वेळखाऊ धोरण सुरु असल्याने मराठा तरूणांचा संयम सुटत चालला असून मुंबई येथील आजाद मैदानातील आंदोलनाला जाहिर पाठिंबा दिला आहे असे नवले यांनी सांगितले. आठ दिवसात सरकारने निर्णय घ्यावा, अन्यथा मुंबई येथे गनीमी काव्याने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा, नवले पाटील यांनी दिला आहे. या वेळी मराठा क्रांती मोर्चा नगर चे समन्वयक कमलेश नवले पाटील, जीवन ज्योत फाऊंडेशनचे अक्षय बोधक, आप्पासाहेब आरगडे आदी उपस्थित होते.