शिवप्रहार न्युज - गळा दाबून पोलिसाला महिला चावली !पोलिसाच्या अंगावर स्कार्पिओ घालून खुनाचा प्रयत्न !!

गळा दाबून पोलिसाला महिला चावली !पोलिसाच्या अंगावर स्कार्पिओ घालून खुनाचा प्रयत्न !!
नगर ( शिवप्रहार न्यूज पोर्टल )आरोपी पकडण्यासाठी नगर तालुक्यातील दहिगाव साकत शिवारात जिल्हा गुन्हे शाखेचे पोलीस पथक गेले असता दरोड्याच्या गुन्ह्यात पाहीजे असलेला आरोपी आनंद काळे याला पकडून पोलीस गाडीत बसून घेऊन जात असताना अचानक आठ ते दहा जण हातात काठी घेऊन पोलिसांवर चालून आले.त्यांनी सरकारी कामात अडथळा आणून त्यातील दोन महिला यांना मारून टाका असे म्हणत एका पोलिसाचा गळा दाबला तर एका पोलीसाच्या पाठीला कडकडून चावा घेतला !
पोलिसांनी कसाबसा बळाचा वापर करत आपली सुटका केली आरोपीला पळून जाण्यासाठी आरोपींनी प्रयत्न केला.त्या प्रकरणी जखमी पोलीस हेडकॉन्स्टेबल बापूसाहेब रावसाहेब फोलाणे ,नेमणूक स्थानी गुन्हे शाखा यांच्या फिर्यादीवरून आरोपी समाधान काळे ,आनंद काळे ,धर्मेंद्र चव्हाण,सुयोग भोसले ,साईनाथ काळे देवानंद चव्हाण, प्रशांत भोसले ,करवंदा काळे ,अक्षदा चव्हाण ,वंदना काळे लंकाबाई काळे ,नमुना काळे यांच्याविरुद्ध नगर तालुका पोलिसात भादवि कलम 307 ,353 व इतर कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि देशमुख पुढील तपास करीत आहे.
दुसऱ्या घटनेत शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल गणेश गलधर व इतर पथक सारखे वस्ती सामनगाव परिसरात पहाटे ४-२० च्या सुमारास वाळू चोरून साठा करणाऱ्या आरोपींना पकडण्यास गेले असता आरोपी लाला शेख याने त्याच्या ताब्यातील स्कार्पिओ गाडी नंबर एम एच 12 एन जी 2712 ही पोलिसांच्या अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.पोलीस बाजूला पळाल्याने बचावले.या प्रकरणी पोलीस गणेश गलधर यांच्या फिर्यादीवरून आरोपी लाला तमीज शेख ,राहणार भातकुडगाव ,ऋषिकेश आहेर ,सचिन , गोकुळ , नागेश यांच्याविरुद्ध वादवी कलम 307,353 पर्यावरण कायदा कलम 3/ 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रशिक्षणार्थी अधिकारी चंद्रकांत रेड्डी यांनी घटनास्थळी भेट दिली. सपोनि शेळके हे पुढील तपास करीत आहे.
पोलीस गुन्हेगारांना पकडताना कसा जीव धोक्यात घालतात याचा प्रत्यय या दोन घटनेत दिलेल्या फिर्यादीवरून समोर आला आहे.या घटनेने पोलीसही सुरक्षित नाही हे पुन्हा एकदा समोर आली आहे.एस.पी.श्री.राकेश ओला यांनी जखमींची माहिती घेतली .