शिवप्रहार न्युज - नगर-मनमाड रस्त्यावर लुटमार करणारे राहुरीचे चौघे आरोपी पकडले...

शिवप्रहार न्युज - नगर-मनमाड रस्त्यावर लुटमार करणारे राहुरीचे चौघे आरोपी पकडले...

नगर-मनमाड रस्त्यावर लुटमार करणारे राहुरीचे चौघे आरोपी पकडले...

   राहुरी/नगर (शिवप्रहार न्युज)- नगर-मनमाड हायवेवर लुटमार (रोड रॉबरी) करणारे राहुरीचे चार सराईत गुन्हेगार जेरबंद करून एक लाख दहा हजार रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त करण्याची कारवाई एमआयडीसी पोलीसांनी केली आहे.

   याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक १०/०७/२०२३ रोजी फिर्यादी नामे अनिल मोहन म्हस्के वय ३६ वर्ष धंदा खाजगी नोकरी रा देहरे ता.जि.नगर यांनी फिर्याद दिली की, दिनांक ०९/०७/२०२३ रोजी रात्री ०९/०० वाचे सुमारास विळद पाण्याची टाकी जवळ देहरे गावचे शिवारात फिर्यादी हे मोटारसायकलवरुन जात असतांना त्यांचे पाठीमागुन चार अनोळखी इसम मोटारसायकलवर आले व फिर्यादीला मोटारसायकल आडवी लावुन त्यांना थांबवुन आमचेकडे गोणीमध्ये तलवार आहे तुला जिवंत मारु अशी धमकी देवून फिर्यादी यांचेकडुन त्यांची १००००० रु किमतीची एमहा कंपनीची आर १५ मोटारसायकल नंबर एम एच १६ सी पी ६८८४ व १०,०००/- रु किमतीचा वन प्लस कंपनीचा मोबाईल असा एकुण १,१०,००० रु किमतीचा मुददेमाल बळजबरीने चोरुन नेला आहे. त्यावरुन एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुरन.६०७/२०२३ भादवि कलम ३९२, ३४१३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   सदर गुन्हयाचा तपास करतांना सपोनि राजेंद्र सानप यांना गोपनिय माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा सराईत आरोपी नागेश संजय चव्हाण, अक्षय उत्तम माळी, संकेत उर्फ सनी सोपान बड़े, किरण उर्फ हुंगा राजेंद्र जगधने, यांनी केला असुन ते राहुरी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सपोनि राजेंद्र सानप यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करुन त्यांना राहुरी येथे पाठविले. सदर पोलीस पथकांनी राहुरी येथुन सदर आरोपींना सापळा रचुन शिताफिने ताब्यात घेतले. त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे नागेश संजय चव्हाण वय २३ रा मोबीन आखाडा, राहुरी, अक्षय उत्तम माळी वय १९ रा. झोपडपटटी, राहुरी, संकेत उर्फ सनी सोपान बर्डे वय २२ रा. झोपडपटटी राहुरी, किरण उर्फ हुंगा राजेंद्र जगधने वय ३० वर्ष जगधने रा. झोपडपटटी, राहुरी असे सांगीतले. सदर आरोपीनी गुन्हयाची कबुली दिली असुन त्यांचेकडुन सदर गुन्हयात चोरी गेलेली १,००००० रु किमतीची एमहा कंपनीची आर १५ मोटारसायकल नंबर एम एच १६ सी पी ६८८४ व १०,०००/- रु किमतीचा वन प्लस कंपनीचा मोबाईल असा एकुण १,१०,००० रु किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी किरण उर्फ हुंगा राजेंद्र जगधने याच्यावर विनयभंगासह २ गुन्हे दाखल आहेत. 

   सदरची कारवाई मा.राकेश ओला पोलीस अधीक्षक, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, संपतराव भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी सो. नगर ग्रामीण विभाग, नगर यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र सानप प्रभारी अधिकारी एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोसई चांगदेव हंडाळ, पोना चव्हाण, पोकॉ.किशोर जाधव, पोकॉ.गजानन गायकवाड, पोकॉ.नवनाथ दहिफळे होम अक्षय खेसे, होम पडवळे तसेच मोबाईल सेल नगरचे मपोना.रिंकु मढेकर, पोकॉ.नितीन शिंदे यांनी केली.