शिवप्रहार न्यूज - अवैध वाळू वाहतूक करणारे २ ट्रॅक्टर पकडले; श्रीरामपूर तालुका पोलिसांची कामगिरी 

शिवप्रहार न्यूज - अवैध वाळू वाहतूक करणारे २ ट्रॅक्टर पकडले; श्रीरामपूर तालुका पोलिसांची कामगिरी 

अवैध वाळू वाहतूक करणारे २ ट्रॅक्टर पकडले; श्रीरामपूर तालुका पोलिसांची कामगिरी 

श्रीरामपूर(शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर तालुक्यातील कमलपूर-भामाठाण रोडवर अवैध वाळू वाहतूक करणारे २ ट्रॅक्टर पकडत श्रीरामपूर तालुका पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 22/02/2023 रोजी प्रभारी अधिकारी सपोनि ज्ञानेश्वर थोरात यांना गुप्त बातमी मिळाली की, मौजे कमालपुर ते भामाठाण परिसरात काही इसम नदिपात्रातुन चोरुन वाळुची वाहतुक करीत आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने सपोनि ज्ञानेश्वर थोरात हे स्वताः तसेच पोसई अतुल बोरसे, पोना/ प्रशांत रणनवरे, पोना/ अनिल शेंगाळे, चापोकों/ चाँदभाई पठाण व होमगार्ड लांडे असे परीसरात खाजगी वाहनाने पेट्रोलींग करीत असताना कमालपुर ते भामाठाण रोडने दोन ट्रॅक्टर जाताना दिसले असता त्यावरील चालकांनी आम्हाला पाहून सदरचे ट्रॉक्टर भरधाव वेगात चालवून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मोठ्या शिताफिने रात्री 12/30 वा सुमारास ताब्यात घेतले. दोन्ही ट्रॅक्टरची पाहणी केली असता ते वाळूने भरलेले दिसले असता आम्ही त्याना वाळु परवाना मागितला असता त्याचेकडे वाळुचा परवाना नसल्याचे सांगितले. ट्रॅक्टर चालक यांना त्यांची नावे विचारली असता त्यंनी त्यांची नावे 1) सुनिल बाबुराव मोरे रा. भामाठाण 2) सर्फराज असगरअल्ली सय्यद रा. भामाठाण 3) शकिल लतीफ काझी रा. भामाठाण ता. श्रीरामपुर असे सांगितले, सदर ट्रॅक्टरचे मालक सर्फराज असगर सय्यद व शकिल लतिफ काझी याच्या मालकीचे असल्याचे सांगितले, सदर ट्रॅक्टर चालक यांनी आम्हा पोलीसांना चकवा देऊन ट्रॅक्टर वेगाने चालवून पळवून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा पाठलाग करुन मोठ्या शिताफिने पकडुन ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी श्रीरामपुर ता.पो.स्टे गुन्हा रजि नंबर 116/2023 भादवि कलम 379,34 पर्यावरण कायदा कलम 3/15 प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन, 1) सुनिल बाबुराव मोरे रा. भामाठाण 2) सर्फराज असगरअल्ली सय्यद रा. भामाठाण 3) शकिल लतीफ काझी रा. भामाठाण ता. श्रीरामपुर यांना दि.23/02/2023 रोजी अटक करण्यात आली आहे. आरोपीकडुन 1) ८१०,००० रु किमतीचा एक सोनालीका कंपनीचा ७४५ मॉडेलाचा निळे रंगाचा ट्रॅक्टर ट्रॉली सह त्यात १ ब्रास वाळु भरलेला. 2) ८१०,००० रु किमंतीचा एक महेंद्रा कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर ट्रॉली सह त्यात १ ब्रास वाळू भरलेला. असा एकूण १६,२०,००० /- रु किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढिल तपास पोसई.अतुल बोरसे हे करीत आहेत.

 सदरची कामगीरी मा.राकेश ओला, पोलीस अधीक्षक नगर, मा.स्वाती भोर, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर आणि मा.संदिप मिटके, उपविभागिय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनचे ज्ञानेश्वर थोरात, सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक संजय निकम व अतुल बोरसे, पोहेकॉ राजेंद्र लंवाडे, पो.ना/ प्रशांत रननवरे, पोना/ अनिल शेंगाळे, चापोकों/ चाँदभाई पठाण यांनी केली आहे.