शिवप्रहार न्युज - कोणालाही विस्थापित होवू देणार नाही - रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे

शिवप्रहार न्युज -  कोणालाही विस्थापित होवू देणार नाही - रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे

कोणालाही विस्थापित होवू देणार नाही - रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे

   श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज) - श्रीरामपूर शहरासह दत्तनगर ग्रामपंचायत ते शिरसगाव ग्रामपंचायत रेल्वे परिसरामध्ये राहणाऱ्या उत्तर आणि दक्षिण भागातील रहिवाशांना गेल्या अनेक दिवसापासून रेल्वे विभागाने नोटीस बजावून ते राहत असलेल्या जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न नोटीसीद्वारे होत आहे यामुळे रेल्वेच्या दोन्ही बाजूने राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते नेवासा रोड कृषी उत्पन्न बाजार समिती समोर नव्याने प्रस्तावित रेल्वे मालधक्क्यामुळे तेथील स्थानिक रहिवासी व व्यावसायिक यांना या धक्क्यामुळे विस्थापित होण्याचा धोका निर्माण झाला आहे माल धक्क्यावर सिमेंट भराई व उतराईमुळे माती मिश्रित सिमेंटच्या प्रदूषणामुळे अनेक रहिवासी हे आजारी पडले असून त्यांना दमा, हृदय विकार ,व डोळ्याचे आजार मोठ्या प्रमाणात झाले आहे तसेच या ठिकाणी अनेक महाविद्यालय मोठी मोठी हॉस्पिटल मधील रुग्णांनाव शाळा या ठिकाणी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनाही या धुळीचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे या विद्यालय महाविद्यालयामध्ये श्रीरामपूर तालुक्यातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात येतात

म्हणून याविषयी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांची विस्थापित होऊ पाहणाऱ्या सर्व रहिवाशांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना मागण्याचे निवेदन सादर केले यासंदर्भामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी संपर्क करून रेल्वे लाईन परिसरातील नागरिकांच्या मागण्या संदर्भामध्ये योग्य ते मार्ग काढण्यासाठी जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी बैठक आयोजित केली होती. भाजपाचे तालुका अध्यक्ष दीपक पठारे, विधानसभा अध्यक्ष नितीन दिनकर, कामगार नेते नागेश सावंत आपचे नेते तिलक डुंगरवाल, शिवसेनेचे नेते सचिन बडदे यांच्या मार्गदर्शनाखाली रावसाहेब दानवे यांची भेट घेण्यात आली यावेळी बोलताना कामगार नेते नागेश सावंत म्हणाले की रेल्वे लाईनच्या दोन्ही परिसरामध्ये राहणारे रहिवाशांना कोणत्याही प्रकारचे त्याचे मालमत्तेवर दुकान व गाळे यांना धक्का पोहोचणार नाही यासाठी नामदार यांनी प्रयत्न करावे यावेळेस तिलक डुंगरावल म्हणाले की या ठिकाणी नेवासा रोड कृषी उत्पन्न बाजार समिती समोर प्रस्तावित रेल्वे माल धक्का झाल्याने झाल्याने अनेक कुटुंब हे बेघर होण्याचा धोका निर्माण झाला आहे, या ठिकाणी उडणाऱ्या सिमेंटच्या धुळीमुळे लोकांचे आरोग्यही धोक्यात येत असल्याचे रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निदर्शनास आणून दिले यावेळी सचिन बडदे यांनी सांगितले की श्रीरामपूर आणि बाकीच्या महाराष्ट्रातील अतिक्रमांचा प्रश्न हा वेगळा आहे श्रीरामपूरमध्ये रेल्वेला जागा उपलब्ध आहे परंतु गुड शेड बांधल्याच्या अट्टहासामुळे या लोकांना विस्थापित होण्याची वेळ येत आहे तसे पाहता सरकारचे नवीन धोरण असे आहे की धक्का हा शहरा बाहेरच असावा त्यासाठी त्यांनी अहमदनगरचे उदाहरण सुद्धा दिले आणि शहरातून वाहतूक होताना जे एक्सीडेंट होतात त्यावेळी निरपराध लोक मारले जात आहे तसेच माल धक्का पासून स्टोरेज पर्यंत खर्चही वाढत आहे तो सुद्धा कमी होणार आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी रेल्वे राज्यमंत्री नामदार रावसाहेब दानवे म्हणाले की हा प्रश्न मला नामदार विखे यांनी सांगितला आहे, रेल्वे प्रशासनाने ज्या काही नोटिसा दिलेले आहेत त्या नोटिसाच्या अनुषंगाने त्या संदर्भामध्ये योग्य ती चौकशी करून रेल्वेची हद्द निश्चित केले विषयक संपूर्ण कागदपत्रे बाबतचे संपूर्ण पुरावे तसेच स्थानिक रहिवाशांकडे असलेले खरेदीखत मालमत्ता सर्वांनी एकत्रित करावे मध्ये सादर करावे आणि योग्य तो निर्णय त्यावेळेस घेऊ. अशा नव्याने प्रस्तावित होणाऱ्या रेल्वे मार्ग याविषयी व तेथे होणाऱ्या धुळी प्रदूषणाविषयक बाबीचा पूर्णपणे अभ्यास केला जाईल नागरिकांच्या आरोग्याला या धक्क्यामुळे जर काही धोका निर्माण होणार असेल तर त्याचेही काळजी घेतली जाईल तसेच याच धक्क्यामुळे जर काही नागरिक रहिवासी विस्थापित होणार असेल तर वायु प्रदूषण व तसेच इतर प्रश्न निर्माण होत असल्यास मालधक्का शहरा लगतच इतरत्र हलविला जाईल. तसेच. जिल्हाधिकारी महसूल विभागाची परवानगी व मालकीचे महसुली पुरावे असतानाही नोटिसा आलेल्या नागरिकांना विस्थापित होऊ दिले जाणार नाही, असे राज्यमंत्री दानवे यांनी सांगितले.

   यावेळी संजय गांगड ,अशोक बागुल, डॉक्टर सौ . भालेराव, मुक्तार शहा, विकास डेंगळे यांनीही सूचना मांडल्या.

याप्रसंगी डॉक्टर सौ.शिरसाट. किरण बोरावके दीपक चव्हाण मारुती बिंगले रुपेश हरकल सतीश सौदागर नाना गांगड ,बंडू शिंदे, मंजुश्री ढोकचवळे, पूजा चव्हाण

युवराज घोरपडे, मोहन अग्रवाल,गणेश कटके,प्रसाद कटके,अलीम शेख, मुबारक शेख,राहुल रणपिसे,

सोनाबाई रजपूत, सुरेखा लोळगे, मंगल लोळगे, मनीषा मोरे, लिलाबाई थोरात, मायावती शिरसाठ, सुशीला सुपेकर, अन्नपूर्णा खंदारे, गौरी सोनवणे, शकीला पठाण, सुनिता सुपेकर ,ताराबाई अवताडे ,सिंधू नागुडे राणी सूर्यवंशी ,आरती सूर्यवंशी ,विजय शेटे, अश्विनी लोळगे, ताराबाई लोळगे, वैष्णवी कराळे, हिराबाई भराडकर, अंबिका सुपेकर, श्री लोळगे जयश्री, लोळगे राधिका, सुपेकर ज्योति, शिरसाठ स्वाती, खंदारे उषा, पांजरे भिमाबाई ,पांजरे कांताबाई गायकवाड, सारिकाअवताडे,

अमित मिरीकर,गणेश खैरनार, राजू गायकवाड, निखिल अग्रवाल, अनिस भाई शेख, नाना साहेब गांगड, राजेंद्र बोरकर, गिरीश गायकवाड, विशाल गायधने, योगेश वाकचौरे, विजय लांबोळे, राजेंद्र येवलेकर, अविनाश गव्हाणे, जयेश परमार, संतोष खाडे, गणेश भडांगे, चंद्रकांत रजपूत, उमेश अग्रवाल, मोहन अग्रवाल, सोमनाथ पवार, नितीन मोरे, संदीप गायकवाड, प्रशांत बागुल, हरीश लोळगे, गणेश शेटे, राजू सुपेकर, सोमनाथ मोरे, मनीष लुक्कड किरण झिरमिटे, राजू गायकवाड, विनोद शिरसाठ, शंकर गायकवाड, मोहसीन कोथमिरे, आधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.