शिवप्रहार न्युज - नगर जिल्ह्यातून 2 वर्षाकरीता हद्दपार करण्यात आलेला आरोपी सर्फराज LCB कडुन जेरबंद….

शिवप्रहार न्युज -   नगर जिल्ह्यातून 2 वर्षाकरीता हद्दपार करण्यात आलेला आरोपी सर्फराज LCB कडुन जेरबंद….

नगर जिल्ह्यातून 2 वर्षाकरीता हद्दपार करण्यात आलेला आरोपी सर्फराज LCB कडुन जेरबंद….

नगर-श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, नगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा नगर यांना नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना चेक करुन हद्दपार गुन्हेगार, हद्दपार आदेशाचा भंग करुन नगर जिल्ह्यामध्ये बेकायदेशिररित्या वास्तव्य करताना मिळून आल्यास कारवाई करणेबाबत आदेशित केले होते.

 नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी दिनांक 10/11/23 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव, सफौ/राजेंद्र वाघ, भाऊसाहेब काळे, पोहेकॉ/अतुल लोटके, संदीप पवार, पोना/रविंद्र कर्डीले व पोकॉ/रविंद्र घुगांसे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून हद्दपार इसमांना चेक करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले. पथक नगर शहरातील हद्दपार गुन्हेगारांना चेक करीत असताना पोनि/दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली कि, हद्दपार इसम नामे सर्फराज जहागिरदार रा. मेहराज मस्जिद जवळ, मुकूंदनगर, नगर हा हद्दपार असताना लपुन छपून अहमदनगर शहरात वास्तव्य करीत आहे आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळविली. 

      पथकाने लागलीच बातमीतील नमुद हद्दपार इसमाचा मुकूंदनगर परिसरात शोध घेता हद्दपार इसम नामे 1) सर्फराज मोहम्मद इब्राहिम सय्यद ऊर्फ सर्फराज जहागिरदार वय 34, रा. मेहराज मस्जिद जवळ, मुकूंदनगर, अहमदनगर हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले. नमुद हद्दपार गुन्हेगाराचे हद्दपार आदेशाबाबत खात्री केली असता, हद्दपार प्राधिकर तथा, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांचेकडील आदेशान्वये अहमदनगर जिल्ह्यातून 2 वर्षा करीता हद्दपार करण्यात आले आहे.

       वरील नमुद हद्दपार इसम हा हद्दपार आदेशाचा भंग करुन बेकायदेशिररित्या नगर शहर भागामध्ये वास्तव्य करीत असताना मिळून आल्याने त्यांचे विरुध्द भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन गु.र.नं. 694/2023 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आला आहे. पुढील कार्यवाही भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे. 

सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. अनिल कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.