शिवप्रहार न्युज - दिवाळी खरेदीसाठी श्रीरामपूरचे मार्केट हाउसफुल्ल;गर्दीने गाठला उच्चांक…
दिवाळी खरेदीसाठी श्रीरामपूरचे मार्केट हाउसफुल्ल;गर्दीने गाठला उच्चांक…
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरामध्ये दिवाळी या सर्वात मोठ्या सणाच्या खरेदीसाठी विविध भागातून आलेल्या नागरिकांमुळे श्रीरामपूरचे मार्केट हाउस फुल्ल झाले आहे.सध्या मार्केटमध्ये इतकी गर्दी आहे की,मोटरसायकल सुद्धा घालता-काढता येत नाही. फोर व्हीलर गाडी तर मार्केटमध्ये जाणे जवळपास अशक्यप्राय झाले आहे.
यंदाच्या मौसमात पावसाळा हा काही विशेष खास राहिला नाही. पावसाने दडी दिल्याने मार्केटवर परिणाम होईल असे वाटत होते.परंतु दिवाळी हा सर्वात मोठा सण असल्याने प्रत्येक नागरिक काही ना काही खरेदी करतच असतो.दिवाळीची बारीक-सारीक खरेदीसह कपडे,दागिने,फराळ,गोडधोड पदार्थ व इतर वस्तूंच्या खरेदी करता श्रीरामपूर शहराच्या मार्केटमध्ये प्रचंड गर्दी पहायला मिळत आहे.जाणकारांचे म्हणणे असे आहे की,यापूर्वी एवढी गर्दी श्रीरामपूरच्या मार्केटमध्ये कधीच पाहायला मिळाली नाही यंदाची गर्दी हा उच्चांक आहे.
हेच आपले श्रीरामपूर जर जिल्हा झाले तर श्रीरामपूरचे मार्केट कोटीच्या कोटी उड्डाणे घेईल.सर्व गोर-गरीब,सर्वसामान्य श्रीरामपूरकरांना त्याचा फायदा होईल.त्या स्वप्नपूर्ती करताच "श्रीरामपूर जिल्हा कृती समिती व शिवप्रहार" च्या माध्यमातून बिगर राजकीय पद्धतीने श्रीरामपूर जिल्हा मोहिमेची लोक चळवळ चालू आहे.
"शिवप्रहार न्यूज"च्या सर्व वाचकांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!