शिवप्रहार न्युज - तब्बल २९ गुन्हे असलेला श्रीरामपूरचा मोठा गुन्हेगार LCB ने पकडला…

शिवप्रहार न्युज -  तब्बल २९ गुन्हे असलेला श्रीरामपूरचा मोठा गुन्हेगार LCB ने पकडला…

तब्बल २९ गुन्हे असलेला श्रीरामपूरचा मोठा गुन्हेगार LCB ने पकडला…

नगर- नमुद बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी नामे उषा अशोक लोंगानी वय 65 वर्षे, रा. सी. 403, अनंत अपार्टमेंट,दांगट इस्टेट, मु. पो. शिवने हवेली, जि. पुणे हल्ली रा. शिंदे पाटील बिल्डींग, मेहेर मळा, ता. संगमनेर, जि. नगर या दिनांक 20/11/2023 रोजी दुपारी 03.00 वा. चे सुमारास त्यांचे नातवाला घेण्यासाठी घराचे बाहेर येवुन त्यांचे नातवाला घेवुन घराकडे जात असतांना पाठीमागुन मोटारसायकलवर दोन आरोपींनी येवुन फिर्यादीचे गळ्यातील 32,000/- रुपये किमतीचे सोन्याचे दोन तोळे वजनाचे गंठण तोडुन बळजबरीने चोरुन घेवुन पळुन गेले होते. सदर घटने बाबत संगमनेर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 937/2023 भादविक 392, 34 प्रमाणे अनोळखी दोन आरोपीविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 नमुद घटना घडल्यानंतर मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधिक्षक,नगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्था.गु.शा.अहमदनगर यांनी गुन्हा उघडकीस आणणे करीता विशेष पथक नेमुण कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. 

 नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोहेकॉ/मनोहर गोसावी, संतोष लोढे, पोना/रविंद्र कर्डीले, पोना/संदीप चव्हाण, गणेश भिंगारदे, संतोष खैरे, पोकॉ/रणजित जाधव, रोहित मिसाळ, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, चापोकॉ/अरुण मोरे पोलीस अंमलदार यांचे पथक नेमुण ना उघड गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले. 

 स्थागुशा पथकाने घटनाठिकाणी भेट देवुन घटनाठिकाणचे आजुबाजुचे सी.सी.सी.टी.व्ही. फुटेज चेक करुन आरोपीची माहिती घेत असतांना सी.सी.टी.व्ही. फुटेजमधील संशयीत आरोपीचे नांव सचिन ताके रा. उंदीरगांव, ता. श्रीरामपुर असे असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीची माहिती काढत असतांना पोनि दिनेश आहेर स्था.गु.शा. अहमदनगर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सचिन ताके रा. उंदीरगांव हा तसेच त्याचा आणखी एक साथीदार असे लाल रंगाचे विना क्रमांकाचे बजाज कंपनीचे पल्सर मोटारसायकलवर श्रीगोंदा रोडने चांदनी चौक अहमदनगर या ठिकाणी येणार आहे अशी बातमी मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले. पोलीस पथकाने चांदनी चौक अहमदनगर या ठिकाणी जावुन सापळा रचुन थांबले असता बातमीतील माहितीप्रमाणे दोन इसम एका लाल रंगाचे विना नंबरचे पल्सर मोटारसायकलवर येतांना दिसले. त्यावेळी पथकाने दोन्ही इसमांना खाली उतरणेबाबत कळविले असता मोटारसायकलचे पाठीमागील सिटवर इसम खाली उतरला असता मोटारसायकल चालकाने त्याचे ताब्यातील मोटारसायकल भरधाव वेगात घेवुन निघुन गेला. ताब्यात घेतलेल्या इसमास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव सचिन लक्ष्मण ताके वय 33 वर्षे, रा. उंदीरगांव, ता. श्रीरामपुर, जि. अहमदनगर असे असल्याचे सांगितले. सदर इसमास ताब्यात घेवुन त्याचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने सखोल विचारपुस करता त्याने पळुन गेलेला त्याचा साथीदार राजेंद्र भिमा चव्हाण उर्फ पप्पु घिसाडी रा. श्रीरामपुर याचेसोबत त्यांचेकडील बजाज कंपनीचे पल्सर मोटारसायकलवर येवुन संगमनेर शहर व राहाता या ठिकाणी गंठण चोरी केल्याचे सांगितले. सदर ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडे गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने सदर गुन्ह्यातील बळजबरीने चोरी केलेले सोन्याचे दागिने विजय पोपट उदावंत रा. रुई, ता. राहाता यास विकले असल्याचे सांगितले. 

        सदर आरोपीचे कब्जामध्ये गुन्ह्यातील चोरी केलेले सोन्याचे दागिने विक्रीतुन आलेले 4,500/- रुपये मिळुन आल्याने ते ताब्यात घेवुन त्यास संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहे व पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे. आरोपी सचिन लक्ष्मण ताके याचेकडुन खालीलप्रमाणे गुन्हा उघडकीस आलेला आहे. 

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

1. राहाता 469/2023 भादवि कलम 392, 34

आरोपी सचिन लक्ष्मण ताके याचेविरुध्द यापुर्वी अहमदनगर व छ. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चैन स्नॅचिंग, खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरुपाचे एकुण - 29 गुन्हे दाखल आहेत.

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

1. श्रीरामपुर शहर 354/2021 भादवि कलम 392, 34

2. तोफखाना 128/2013 भादवि कलम 392, 34

3. तोफखाना 19/2013 भादवि कलम 392, 34

4. तोफखाना 380/2013 भादवि कलम 392, 34

5. संगमनेर शहर 404/2019 भादवि कलम 392, 34

6. तोफखाना 441/2013 भादवि कलम 392, 34

7. तोफखाना 465/2013 भादवि कलम 392, 34

8. तोफखाना 467/2013 भादवि कलम 392, 34

9. तोफखाना 469/2013 भादवि कलम 392, 34

10. शिर्डी 54/2014 भादवि कलम 392, 34

11. शिर्डी 68/2015 भादवि कलम 392, 34

12. शिर्डी 82/2015 भादवि कलम 392, 34

13. श्रीरामपुर शहर 31/2015 भादवि कलम 392, 34

14. शिर्डी 36/2015 महाराष्ट्र पो. कायदा क. 142

15. कोपरगांव शहर 153/2016 भादवि कलम 392, 34

16. श्रीरामपुर शहर 26/2016 भादवि कलम 392, 34

17. संगमनेर शहर 37/2017 भादवि कलम 392, 34

18. संगमनेर शहर 47/2017 भादवि कलम 392, 34

19. लोणी 14/2017 भादवि कलम 392, 34

20. राहुरी 72/2017 भादवि कलम 392, 34

21. श्रीरामपुर शहर 93/2017 भादवि कलम 392, 34

22. लोणी 121/2018 भादवि कलम 392, 34

23. लोणी 165/2018 भादवि कलम 392, 34

24. राहाता 274/2019 भादवि कलम 307, 353, आर्म ऍ़क्ट 3/25

25. संगमनेर शहर 478/2019 भादवि कलम 392, 34

26. श्रीरामपुर शहर 80/2019 भादवि कलम 392, 34

27. श्रीरामपुर शहर 1545/2020 भादवि कलम 392, 34

28. श्रीरामपुर शहर 1546/2020 भादवि कलम 392, 34

29. जवाहरलाल, छ. संभाजीनगर 72/2022 भादवि कलम 392, 411, 34

       सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. मा. श्रीमती. स्वाती भोर, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व श्री. सोमनाथ वाकचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.