शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर वकील संघाच्या अध्यक्षपदी ताके,उपाध्यक्षपदी जंगले-वर्मा तर सचिवपदी कैलास आगे यांची बिनविरोध निवड…

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपूर वकील संघाच्या अध्यक्षपदी ताके,उपाध्यक्षपदी जंगले-वर्मा तर सचिवपदी कैलास आगे यांची बिनविरोध निवड…

श्रीरामपूर वकील संघाच्या अध्यक्षपदी ताके,उपाध्यक्षपदी जंगले-वर्मा तर सचिवपदी कैलास आगे यांची बिनविरोध निवड…

 श्रीरामपूर- वकील संघाचा सन २०२४चा निवडणुक प्रोग्राम निवडणुक निर्णय अधिकारी अॅड. विजयराव साळुंके यांनी प्रसिध्द केला. निवडणुक प्रोग्राम प्रमाणे अध्यक्षपदासाठी अॅड. विष्णु नारायणराव ताके पाटील यांचा तसेच उपाध्यक्षपदासाठी अॅड. सुभाष राजाराम जंगले त्याचप्रमाणे महिला उपाध्यक्षपदासाठी अॅड. मनिषा सी. वर्मा त्याचप्रमाणे सचिवपदी अॅड. कैलास शंकरराव आगे तसेच खजिनदार पदी अॅड. आण्णासाहेब भागवत मोहन यांचे सर्वांचे एकमेव अर्ज आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी अॅड. विजयराव साळुंके यांनी दि. २२/१२/२०२३ रोजी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे वकील संघाच्या सभेमध्ये जाहीर केले. 

      निवडणुक निर्णय अधिकारी यांना सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन अॅड. महेंद्र आढाव यांनी तसेच ग्रंथपाल तुकाराम गाडेकर यांनी सहकार्य केले. निवडणुक कार्यक्रम हा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. निर्णय घोषीत करतेवेळी वकील संघाचे ज्येष्ठ सदस्य अॅड. बी. डी. घाडगे, अॅड. बी. एफ चुडीवाल, अॅड. दादासाहेब औताडे यांनी वकील संघास मार्गदर्शन करून नवीन पदाधिकाऱ्यांस शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे सदर प्रसंगी वकील संघाचे सन्माननीय सदस्य उपस्थित होते.सर्वांनी नवीन पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील कारकीर्दीस हार्दीक शुभेच्छा देवुन सुयश चिंतीले. तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड. विष्णु नारायणराव ताके पाटील यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.