शिवप्रहार न्यूज - श्री साईबाबा हॉस्पिटलमध्‍ये ०९ वर्षाच्‍या मुलावर मेंदुची गाठीची सचेतन शस्‍त्रक्रिया यशस्‍वी…

शिवप्रहार न्यूज - श्री साईबाबा हॉस्पिटलमध्‍ये ०९ वर्षाच्‍या मुलावर मेंदुची गाठीची सचेतन शस्‍त्रक्रिया यशस्‍वी…

श्री साईबाबा हॉस्पिटलमध्‍ये ०९ वर्षाच्‍या मुलावर मेंदुची गाठीची सचेतन शस्‍त्रक्रिया यशस्‍वी…

शिर्डी -

                 श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या श्री साईबाबा हॉस्पिटलमध्‍ये न्‍युरो सर्जन डॉ.मुकुंद चौधरी व भुलतज्ञ डॉ.संतोष सुरवसे यांच्‍या न्‍युरो ओटीच्‍या टिमने नऊ वर्षाच्‍या मुलावर मेंदुची गाठीची सचेतन शस्‍त्रक्रिया यशस्‍वीरित्‍या पार पाडली असुन या यशस्‍वी शस्‍त्रक्रियेबद्दल संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी सर्व न्‍युरो सर्जरी टीमचे अभिनंदन केले.

                    श्री साईबाबा संस्‍थान संचलित श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्‍णालयात राज्‍याच्‍या कानाकोप-यातुन तसेच राज्‍याबाहेरील हजारो रुग्‍ण विविध उपचारांसाठी दाखल होत असतात. या रुग्‍णालयामध्‍ये मेंदु शल्‍य विभागात (Neurosurgery) दर महिन्‍याला साधारणत सरासरी ६० ते ७० मेंदु आणि मणक्‍याच्‍या शस्‍त्रक्रिया होतात. त्‍यातच बीड जिल्‍हा गेवराई तालुक्‍यातील पाचेगाव येथील ०९ वर्ष वयाचा कु.गणेश गोरख पवार याला एक वर्षापासुन फीट येत असल्‍याने विविध ठिकाणी उपचार घेवुन शेवटी श्री साईबाबा हॉस्पिटलमध्‍ये उपचारासाठी आले. डॉक्‍टरांनी रुग्‍ण पाहील्‍यानंतर त्‍यांना एमआरआय करणेचा सल्‍ला दिला मेंदुचा एमआरआय केला असता मुलाच्‍या उजव्‍या मोठया मेंदु मध्‍ये एक ३x३ सेंटीमीटर (एक लिंबुच्‍या आकाराची) गाठ आढळुन आली. त्‍यानुसार कन्‍सलटंट न्‍युरो सर्जन डॉ.मुकुंद चौधरी यांनी सर्व रिपोर्टस तपासले पेंशटची गाठ ज्‍या भागात होती तो भाग नाजुक असुन त्‍याच भागातुन डाव्‍या हात व पाय चालविणा-या नसांचा उगम होत असुन ऑपरेशन दरम्‍यान त्‍या भागाचा धक्‍का लागुल मुलाला अर्धांगवायु होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही, असे रुग्‍णांचे आई वडील यांना समजावुन सांगितले. ऑपरेशनची आवश्‍यकता असल्‍याने मुलाचं आई वडील यांनी कठोर मनाने ऑपरेशन करण्‍यास परवानगी दिली. डॉ.मुकुंद चौधरी यांना त्‍यावर सचेतन शस्‍त्रक्रिया हा योग्‍य पर्याय वाटला सचेतन शस्‍त्रक्रिया दरम्‍यान रुग्‍णांना पुर्ण भुल दिली जात नाही. ज्‍यामुळे ऑपरेशन चालु असतानाही रुग्‍णांशी सवांद साधता येतो. तसेच मेंदुची गाठ काढताना हात व पाय यांची ताकद वारंवार तपासता येवु शकते ज्‍यामुळे रुग्‍णाचा अर्धांगवायु होण्‍याचा धोका टळु शकतो. हे प्रकरण वरकरणी सोपे वाटत असले डॉ.मुकुंद चौधरी यांना अशा ऑपरेशनचा अनुभव अन प्राविण्‍य असले तरी खरी अडचण समोर होती ती ९ वर्ष वय असलेले मुलं जिथे इजेक्‍शन ला घाबरतात तिथे हा मुलगा जागे राहुन ऑपरेशन करुन घेईल का? हा मोठा प्रश्‍न होता. तिथे वरिष्‍ठ भुलतज्ञ डॉ.सतोष सुरवसे यांचा प्रदिर्घ अनुभव कामी आला. त्‍यांच्‍याशी चर्चा केली असता त्‍यांनी बेशुध्‍द न करता भुल देण्‍यासाठी तयारी दर्शवली. पेशंट आणि पालक यांना समजावुन सांगुन आधी त्‍यांचा आत्‍मविश्‍वास मिळवला. मुलाचे सहकार्य यासाठी महत्‍वाचे होते. त्‍यामुळे मुलाला सर्व समजावुन त्‍याने होकार दिल्‍यानंतरच ऑपरेशन ची तयारी करण्‍यात आली.

                     दि.२६ डिसेंबर २०२२ रोजी डॉ.संतोष सुरवसे यांनी फक्‍त डोक्‍याच्‍या त्‍वचेला भुल दिली. त्‍यानंतर रुग्‍णाला कुठलेही झोप येणारे इंजेक्‍शन दिले गेले नाही. डॉ.मुकुंद चौधरी यांनी त्‍यानंतर साधारणपणे दिड तासात पुर्ण गाठ काढुन ऑपरेशन संपविले. ऑपरेशन दरम्‍यान मुलाच्‍या हात व पाय यांच्‍या ताकदीची वारंवार तपासणी करण्‍यात रुग्‍ण ऑपरेशन दरम्‍यान जागाच असल्‍यामुळे व ऑपरेशन दरम्‍यान शुन्‍य वेदना झाल्‍यामुळे ही तपासणी करणे शक्‍य झाले. गाठ १०० टक्‍के काढुन ही मुलाला कसलाही त्रास झाला नाही. अन अर्धांगवायु होण्‍याचा त्‍याचा धोका ही टाळता आला.

                 एका ९ वर्षाच्‍या मुलामध्‍ये झालेली ही शस्‍त्रक्रिया त्‍यामुळेच आगळी वेगळी ठरली. अशी आगळी वेगळी शस्‍त्रक्रिया यशस्‍वीरित्‍या पार पाडल्‍याबद्दल संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, श्री साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक लेफ्ट कर्नल डॉ.शैलेश ओक व उप वैद्यकीय संचालक डॉ.प्रितम वडगावे यांनी सर्व न्‍युरो सर्जरी टीमचे अभिनंदन केले. याबरोबरच रुग्‍णाला महात्‍मा ज्‍योतिराव फुले या योजनेच्‍या माध्‍यमातुन निशुल्‍क सर्व उपचार करणेत आल्‍यामुळे रुग्‍णांचे वडील गोरख पवार यांनी श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईबाबा संस्‍थानचे आभार मानले.