शिवप्रहार न्युज - डॉक्टर ब्रह्मेंच्या घरी चोरीतील आरोपींचे धागेदोरे पोलिसांना मिळाले…

शिवप्रहार न्युज -  डॉक्टर ब्रह्मेंच्या घरी चोरीतील आरोपींचे धागेदोरे पोलिसांना मिळाले…

डॉक्टर ब्रह्मेंच्या घरी चोरीतील आरोपींचे धागेदोरे पोलिसांना मिळाले…

श्रीरामपूर-(शिवप्रहार न्यूज)श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नंबर ०७ काळाराम मंदिर जवळील प्रसिद्ध डॉक्टर ब्रह्मे यांच्या हॉस्पिटलमध्ये राहत्या घरी वरच्या खोलीतून घरात उतरून कपाटातील सुमारे 40 लाखाची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. या प्रकरणी एस.पी.राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गवळी हे स्वतः बारकाईने तपास करत होते. या प्रकरणी मुख्य चोरट्यांचे धागेदोरे शहर पोलिसांच्या हाती लागले असून यासंबंधी पोलीस निरीक्षक गवळी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी धागेदोरे मिळाले असून सविस्तर माहिती आज सायंकाळी एस.पी.राकेश ओला यांच्या उपस्थितीत देण्यात येईल असे सांगितले. अजून तपास सुरू असून याप्रकरणी एका कर्मचारी व महिलेचा हात असल्याचीही चर्चा होत आहे.

       दरम्यान श्रीरामपूर शहर पोलिसांनी अनेक दिवसांपासून बारकाईने तपास करत डॉक्टर ब्रह्मे यांच्या घरातील चाळीस लाख रोकड चोरी ह्या मोठ्या चोरीचा तपास जवळजवळ लावला असून लवकरच यासंबंधी सविस्तर आरोपींची माहिती जनतेसमोर येईल.