शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात सिंधी मंदिरात श्रीराम प्रभू मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त सच्चरित्र पारायण सोहळा संपन्न…
श्रीरामपुरात सिंधी मंदिरात श्रीराम प्रभू मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त सच्चरित्र पारायण सोहळा संपन्न…
श्रीरामपूर(प्रतिनिधी)-भारतभर नव्हेतर जगभर हेवा वाटावा असा उत्साहपुर्ण वातावरणात 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे 500 वर्षांनंतर श्रीराम लल्लाची मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा सोहळा संपन्न झाला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते विधीवत पुजा अर्चा करून संत महात्म्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
या पार्श्वभूमीवर श्रीरामपुरात विविध ठिकाणी, विविध मंदिरांमध्येही सदरचा सोहळा उत्साहाच्या वातावरणात पार पडला.
त्यात श्रीरामपुरात सिंधी मंदिरात मोठया भक्तिमय वातावरणात या सोहळयाला सुरूवात झाली. या प्रभू श्रीराम लल्लाच्या मूर्ती प्राणपप्रतिष्ठापना निमित्त श्रीरामपूर येथे सिंधी मंदिरात दि.17 जानेवारी ते 22 जानेवारी सकाळी 10.30 ते सायं. 7.30 यादरम्यान श्रीराम सच्चरित पारायणाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी सर्व भाविक भक्तांना भक्तिमय वातावरणात महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी रोहीत दुग्गल यांच्या मधून वाणीमध्ये भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. त्याचा सर्व भाविक भक्तांनी आनंद घेतला.
यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिंधी मंदिराचे विश्वस्त रामचंद्र आहुजा, शाम चुग, परसराम आहुजा, भगवानदास वलेशा, बबलू आहुजा, सुनिल आहुजा, डॉ.भारत गिदवाणी, श्रीचंद आहुजा, बबलू सिंधवाणी, रामचंद्र गेरेला, शाम सिंधवाणी व मंदिराचे सेवाधारी राजेश आहुजा, रविंद्र गरेला, संतोष गरेला, अमित आहुजा, अमित गिदवाणी, किशोर ग्यानचंदानी, किशोर वीरवाणी, मंगेश छतवाणी, विजय सिंधवाणी, जितेंद्र चुग, ओम चुट्टाणी, लक्ष्मण गेरेला, अशोक भागवाणी, मनोहरलाल रामनाणी, किशोर छगवाणी, सुमित सिंधवाणी, अजय माखिजा, सागर आहुजा, अजय आहुजा, राम सिंधवाणी, लखन सिंधवाणी, राजकुमार सिंधवाणी, शंकरलाल बच्चाणी, हरिलाल आछडा, राजेश आहुजा, अंकित आहुजा, लकी आहुजा, गणेश माखिजा, जवाहर कुकरेजा, सुंदरलाल कुकरेजा, लक्ष्मण गेरेला, आशिष बठेजा, अनिल आहुजा, मुकेश सिंधवाणी, प्रविण छतवाणी,अमित आहुजा, अनिल आहुजा, रवी तलरेजा, दिलीप तलरेजा, अमित गिडवाणी, हरीलाल आचडा, लखन आछडा, प्रकाश आचडा राजू बालानी आदींनी विशेष परिश्रम घेतले. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडल्याबद्दल मा.नगरसेवक राजेश अलघ, रविंद्र गुलाटी यांनी सर्व भाविकांचे आभार मानले.