शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाला जागा खाली करा म्हणत सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्र! श्रीरामपूरकरांमध्ये खळबळ!! १७ जुनला बंदची हाक..!!!
श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाला जागा खाली करा म्हणत सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्र! श्रीरामपूरकरांमध्ये खळबळ!! १७ जुनला बंदची हाक..!!!
श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)- श्रीरामपूर शहरात असलेले अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय खाली करावी असे लेखी पत्रच सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता, संगमनेर यांनी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाला दिल्याने हे कार्यालय आता नेमके कोठे जाणार याची दबक्या आवाजात जोरदार चर्चा सुरू झाली असून यासंबंधी सार्वजनिक बांधकाम विभाग संगमनेर कार्यालयाशी संपर्क साधला असता तेथील कर्मचाऱ्यांने पत्र दिल्याच्या घटनेला दुजोरा दिला.मात्र आपण कार्यकारी अभियंता यांच्याशी बोलावे असे सुचविले कार्यकारी अभियंता यांचा मोबाईल नंबर आऊट ऑफ कव्हरेज एरिया आहे. दरम्यान मिळालेली माहिती पक्की असून
श्रीरामपूर शहरातील नेवासा रोडवर जागृत श्री रेल्वे स्टेशन हनुमान मंदिर समोर सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीरामपूर कार्यालय असून तेथील ब्रिटिश कालीन बांधलेल्या खोल्यांमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांचे कामकाज चालते मोठ्या प्रयत्नाने त्यावेळी स्वर्गीय जयंत ससाणे व स्वर्गीय गोविंदराव आदिक यांनी हे कार्यालय श्रीरामपूरला व्हावे म्हणून मंजुरी मिळवली होती व या कार्यालयाचे कामकाज श्रीरामपुरात सुरू झाले तेव्हापासून अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय बांधकाम विभागाच्या जागेतच सुरू आहे. या कार्यालयात पहिले अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून आताचे पोलीस महानिरीक्षक बि.जे.शेखर पाटील होते. त्यानंतर श्रीकांत पाठक, सुनील कडसने, रोहिदास पवार, संजय जाधव, सुनिता साळुंखे-ठाकरे व आता अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून स्वाती भोर या काम पाहत आहेत. श्रीरामपूर शहरातील राजकारण्यांच्या दुर्लक्षामुळे आज अखेर गृह विभागाकडून श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षकच्या कार्यालयासाठी कोणीही जागा अथवा इमारतीसाठी ठोस असे प्रयत्न केले नाही. परिणामी श्रीरामपूर बांधकाम विभागाच्या जागेत नव्याने मोठे बांधकाम होणार असल्याने सध्या सुरू असलेले अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय तातडीने हलवावे असे पत्र बांधकाम विभागाने दिल्याने तेथील कामकाज नेमके कोणत्या जागेत चालणार ? अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर कार्यालयासाठी दुसरी सध्या तयार असलेली सरकारी इमारत कोणती ? का हे कार्यालय देखील शिर्डी अथवा संगमनेर येथील सरकारच्या इमारतीत जाणार का ? अशी चर्चा जोर धरू लागली असून नुकतेच अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डीला मंजूर झाले ते भूसंपादनाचे असले तरी श्रीरामपूर जिल्हा व्हावा यासाठी आता पुन्हा कार्यकर्ते व नेते आंदोलन सुरू करीत आहे. अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूरातच राहावे व त्यांना तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी कोणता राजकीय नेता कसे काम करतो याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे. जर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाला श्रीरामपूर शहरात जागा उपलब्ध झाली नाही तर हे कार्यालय कोठे जाणार त्याचे कामकाज कसे चालणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला असून गृह विभागाकडून यासंबंधी काही सूचना आल्या किंवा काय हे समजू शकले नाही. दरम्यान श्रीरामपूरच्या नेतेमंडळीनीं अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालयासाठी तातडीने जागा उपलब्ध करून घ्यावी, कार्यालय श्रीरामपूर शहराच्या बाहेर जाऊ देवू नये अशी मागणी शिवप्रहार प्रतिष्ठानने केली आहे. आज श्रीरामपूर जिल्हा व्हावा यासाठी श्रीरामपूर मर्चन्ट असोसिएशनने शनिवार दिनांक १७ जुन रोजी श्रीरामपूर बंदची हाक दिली असून सर्वांनी गटतट विसरून बंद मध्ये सामील व्हावे असे आवाहन केले आहे. तसेच श्रीरामपूर बंदला शिवप्रहार प्रतिष्ठान ने पाठिंबा जाहिर केला आहे. तसेच आज सकाळी सर्व पक्षीयांच्यावतीने श्रीरामपूरला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय द्यावे म्हणून निवेदन प्रांताधिकारी किरण सावंत यांना निवेदन दिले.