शिवप्रहार न्युज - महिला अधिकाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी ! जिल्ह्यात खळबळ !!

शिवप्रहार न्युज - महिला अधिकाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी ! जिल्ह्यात खळबळ !!

महिला अधिकाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी ! जिल्ह्यात खळबळ !!

नगर (शिवप्रहार न्यूज )नगर जिल्ह्यातील एका सरकारी नोकरी करणाऱ्या महिला अधिकाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी करण्याचा प्रकार घडल्याने नगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून या घटनेने महिला वर्गात काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

     या धक्कादायक घटनेची माहिती अशी की,नगर जिल्ह्यात एका सरकारी कार्यालयात नोकरी करत असलेली महिला अधिकारी आपले कामकाज करत असताना तिला तिच्या मोबाईल नंबरवर एका नंबर वरून फोन आला व सदर बोलणाऱ्या व्यक्तीने महिला अधिकाऱ्याला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने सदर महिला अधिकाऱ्याला लज्जा उत्पन्न झाली. एवढ्यावरच कॉल करणारा लिंगपिसाट थांबला नाही.त्याने थेट सदर सरकारी महिला अधिकाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी केली.

      या प्रकारानंतर पीडित तरुण महिला अधिकारी यांनी थेट ही गोष्ट वरिष्ठांच्या कानावर घातली.त्यानंतर पोलिसात संबंधित शरीरसुखाची मागणी करणारा लिंगपिसाट आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे. पोलीस यातील आरोपीचा कसून शोध घेत असल्याचे समजते.पोलिसांना आरोपीचा मोबाईल नंबर पिडीत महिला अधिकाऱ्याने कळविला असल्याचे समजते.त्यामुळे आरोपीपर्यंत पोहचण्यास पोलिसांना वेळ लागणार नाही असे दिसते.