शिवप्रहार न्युज - खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी सोपान राऊतचा जामीन फेटाळला...
खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी सोपान राऊतचा जामीन फेटाळला...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)- श्रीरामपूर तालुक्यात खळबळ उडवून देणाऱ्या निपाणी वडगाव येथील रमेश पवार याच्या खूनाच्या गुन्ह्यातील मास्टरमाईंड अशोक कारखान्याचा माजी चेअरमन सोपान राऊत याचा जामीन अर्ज श्रीरामपूर जिल्हा सत्र न्यायाधीश मा.एस.आर.यादव यांनी फेटाळला आहे.
आज सोमवारी रमेश पवार याच्या खुनाच्या गुन्ह्यात जामीन मिळण्यासाठी सोपान राऊत याने श्रीरामपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. राऊत याच्यावतीने पुणे येथील ॲड. हर्षद निंबाळकर यांनी बाजू मांडत सोपान राऊत याच्याविरुद्ध प्रथमदर्शनी ठोस पुरावा नसल्याचे सांगितले यावर आक्षेप घेत सरकारी वकील ॲड.प्रसन्न गटणे यांनी न्यायालयाला प्रथमदर्शनी पुरावा असल्याचे सांगितले. मा.न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेत सरकारची बाजू ग्राह्य धरून जामीन अर्ज फेटाळला आहे.
रमेश पवार याच्या खूनाचा कट त्याची पत्नी सविता पवार, सोपान राऊत, अजय गायकवाड, प्रसाद भवार यांनी रचला होता. सुरुवातीला रमेशचा झोपेत मृत्यू झाला असल्याचा बनव आरोपींनी केला होता, परंतु पोलीस तपासात आरोपींनी रमेशला दारू पाजून अपहरण करून त्याचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले होते.