शिवप्रहार न्यूज- नगर पोलीसांच्यावतीने आयोजित रोजगार मेळावा व आरोपी शरणागती कार्यक्रम संपन्न…

शिवप्रहार न्यूज- नगर पोलीसांच्यावतीने आयोजित रोजगार मेळावा व आरोपी शरणागती कार्यक्रम संपन्न…

नगर पोलीसांच्यावतीने आयोजित रोजगार मेळावा व आरोपी शरणागती कार्यक्रम संपन्न…

 नगर - नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉक्टर श्री.बी.जी.शेखर पाटील यांच्या कम्युनिटी पोलिसिंग मिशन अंतर्गत व पोलीस अधीक्षक श्री.मनोज पाटील यांच्या संकल्पनेनुसार आज रविवार दिनांक 17/7/2022 रोजी पेमराज सारडा महाविद्यालय येथे पोलीस व आरोपीचे पाल्य यांचे करता रोजगार मेळावा व पोलीस मुख्यालय, नगर येथे आरोपी शरणागती मेळावा संपन्न झाला.

        रोजगार मेळाव्यास एकूण 1860 तरुणांनी सहभाग घेतला तर यातील 1023 तरुणांना नियुक्ती देण्यात आली आणि प्रत्यक्ष नियुक्तीचे पत्र 460 तरुणांच्या हाती देण्यात आले.

        तसेच आरोपी शरणागती मेळाव्यामध्ये एकूण 155 विविध गुन्ह्यातील आरोपींनी कायद्यासमोर शरणागती पत्करली आहे.

       या कार्यक्रमास पद्मभूषण समाजसेवक श्री.अण्णा हजारे,अप्पर पो.अधीक्षक सौरव अग्रवाल व श्रीमती स्वाती भोर यांच्यासह नगर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी,विविध वृत्तपत्राचे व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे संपादक,प्रतिनिधी हजर होते.