शिवप्रहार न्युज - पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर ऑफ सायन्स या मानद पदवीने सन्मानित...
पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर ऑफ सायन्स या मानद पदवीने सन्मानित...
राहुरी (शिवप्रहार न्युज)- आज राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात ३७ वा पदवीदान समारंभ पार पडला. यावेळी विद्यापीठाच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांना डॉक्टर ऑफ सायन्स या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले.
डॉक्टर ऑफ सायन्स या मानद पदवीने सन्मानित केल्यानंतर ना.विखे म्हणाले की, माझ्या सामाजिक जीवनात मिळालेल्या प्रत्येक पदाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आजपर्यंत केला. सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांना २२ ऑक्टोबर १९७८ आणि पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांना २९ नोव्हेंबर २०१२ रोजी कृषी विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी देऊन सन्मानित केले होते. त्यांच्या संस्काराचा आणि कार्याचा वारसा पुढे घेऊन जाताना शैक्षणिक आणि समाजाप्रति केलेल्या कार्याचा हा मी बहुमुल्य सन्मान समजतो. एका माजी विद्यार्थ्याचा कृषी विद्यापीठाकडून झालेला सन्मान खूपच अभिमानास्पद आहे. मानद पदवीने यापुढील कार्यास एक नवी प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे.