शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात पाट फुटून पाणी इतरत्र घुसले;उलटसुलट चर्चेला उधाण ...
श्रीरामपुरात पाट फुटून पाणी इतरत्र घुसले;उलटसुलट चर्चेला उधाण ...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर शहरातील नॉर्दन ब्रँच कडून येऊन वॉर्ड नंबर 2 मधून गेलेल्या प्रवरा कालव्याला (पाटाला) काल मंगळवारी दुपारी मोठे भगदाड पडले. तर काहींचे म्हणने आहे कि,हि रेग्युलर पाणी गळती आहे.परंतू यात पाटाला भगदाड पडल्यामुळे वैदूवाडा पुलापासून थोड्या अंतरावर या भागातून पाणी शेजारच्या रस्त्यावर तसेच आसपासच्या घरांमध्ये शिरून मोठे नुकसान झाले आहे. जवळच नगरपालिकेची मोठी गटार असल्याने बरेचसे पाणी त्या गटारीत वाहून गेले. दुसऱ्या बाजूला फातेमा कॉलनीच्या बाजूने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले.
दुपारपासून रात्रभर प्रचंड पाणी वाया गेले असून परिसरातील नागरिकांना सुद्धा याचा मोठा त्रास झाला आहे. परंतु पाटबंधारे खाते, नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा कालवा अनेक ठिकाणी उखडला आहे. वैदूवाड्यात पुलाजवळ तर या कालव्याचे पात्र एखाद्या नदीसारखे झाले आहे. काल कालव्याला मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेल्याने हे पाणी ओव्हरफ्लो होऊन कालव्याच्या बाहेर पडले.त्यातच दोन ठिकाणी भगदाड पडल्याने सदर पाणी नागरी वस्तीमध्ये शिरले.
पाटाला पाणी आल्यानंतर पाटबंधारे खात्याच्या कर्मचाऱ्यांनी त्यावर लक्ष ठेवणे बंधनकारक होते.मात्र या बाबीकडे पाटबंधारे खात्याने दुर्लक्ष केल्याने जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली.तसेच या पाण्यामुळे नुकसान झालेल्या घरांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.दुसरीकडे काही नागरिकांचे म्हणने आहे कि,हि रेग्युलर पाणी गळती आहे.