शिवप्रहार न्युज - जरांगे पाटलांच्या आवाहनानंतर बाजाठाणचे भराडे पाटील यांना छ.संभाजीनगरसाठी लोकसभेची उमेदवारी…
जरांगे पाटलांच्या आवाहनानंतर बाजाठाणचे भराडे पाटील यांना छ.संभाजीनगरसाठी लोकसभेची उमेदवारी…
वैजापूर- सरकार मराठा आरक्षणबाबत मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने लढत राहायचे अशी भूमिका मराठायोद्धा श्री.मनोजदादा जरांगे पाटलांनी घेतली आहे.त्याचाच एक भाग म्हणुन लोकसभेला उमेदवार उभे करण्यात येणार असुन त्यासाठी जरांगे पाटील यांनी समाजाला आवाहन केले आहे.त्यांच्या आवाहनानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने दादासाहेब भाऊसाहेब भराडे यांना लोकसभेची उमेदवारी घोषित करणारे बाजाठाण गाव हे वैजापूर तालुक्यातील पाहिले गाव ठरले आहे.
गावातून सकल मराठा समाजाच्या वतीने गाव वर्गणी करून छत्रपती संभाजीनगर जागेसाठी खासदारकीची उमेदवारी दादासाहेब भाऊसाहेब भराडे यांना देण्यात आली आहे.त्याबद्दल त्यांचे सकल मराठा समाजाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.