शिवप्रहार न्युज - गावठी कट्टा व 02 जिवंत राऊंडसह सराईत गुन्हेगारास अटक;श्रीरामपूर शहर पोलीसांची कामगिरी…
गावठी कट्टा व 02 जिवंत राऊंडसह सराईत गुन्हेगारास अटक;श्रीरामपूर शहर पोलीसांची कामगिरी…
श्रीरामपूर- शहर पो.ठाण्याचे पोनि. नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नविन तहसील ऑफीस जवळील हुसेननगर कमानीजवळ, वार्ड नं.01, श्रीरामपूर येथे पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला एक इसम स्वतःचे कब्जात गावठी कट्टा जवळ बाळगुन उभा आहे. अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने पोनि. नितीन देशमुख यांनी तात्काळ तपास पथकास सदर ठिकाणी जावुन बातमीप्रमाणे खात्री करुन त्याचेवर कारवाई करा. असा तोडी आदेश दिल्याने तपास पथकाने तात्काळ दोन लायक पंचासह सदर ठिकाणी जावुन खात्री केली असता एक पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला इसम हुसेननगर कमानीजवळ उभा दिसला, त्यास तपास पथकाची चाहुल लागताच तो पळुन जावु लागला असता त्यास तपास पथकाने पाटलाग करुन शिताफिने पकडुन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव आदम उर्फ भैय्या युसुफ शहा, वय 27 वर्षे, रा. काझीबाबा रोड, वार्ड नं. 02, श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले.
त्यास पोलीस व पंचांची ओळख सांगुन त्याची अंगझडती घेतली असता त्याचे डावे कंबरेला गावठी कट्टा व दोन राऊंड मिळुन आले त्याचे वर्णन खालील प्रमाणे.
1) 35,000/- रु. किंमतीचा एक गावठी कट्टा पांढऱ्या रंगाचा त्यावर इंग्रजी अक्षरात MADE IN JAPAN असे नाव असलेला मॅगझीनसह जु.वा. किं.अ.
2) 2000/- रु.कि.चे दोन पिवळ्या रंगाचे राऊंड जु.वा.कि.अ.
37,000/-रु. एकुण
सदर आरोपीवर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं. 352/2024 भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला व नमुद गुन्हयात त्यास तात्काळ अटक करुन मा. न्यायालया समक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने सदर आरोपीस दिनांक 26/03/2024 पर्यतची चार दिवासांची पोलीस कस्टडी रिमांड मजुर केले असुन पुढील तपास पोलीस करत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, नितीन देशमुख, यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, परि. पोलीस उपनिरीक्षक / दिपक मेढे, पोना/रघुवीर कारखेले, पोकों/ राहुल नरवडे, पोको/ गौतम लगड, पोकी/ रमिझराजा अत्तार, पोकों/ संभाजी खरात, पोकों/अजित पटारे, पोकों/आकाश वाघमारे, मपोकों/ मिरा सरग यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली परि. पोलीस उपनिरीक्षक/ दिपक मेढे, हे करीत आहेत.