शिवप्रहार न्युज - काही हॉस्पीटल/दवाखान्यांच्या हलगर्जीपणामुळे श्रीरामपुरातील कचरा डेपो कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात...

शिवप्रहार न्युज -  काही हॉस्पीटल/दवाखान्यांच्या हलगर्जीपणामुळे श्रीरामपुरातील कचरा डेपो कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात...

काही हॉस्पीटल/दवाखान्यांच्या हलगर्जीपणामुळे श्रीरामपुरातील कचरा डेपो कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात...

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-गेल्या काही दिवसांपासून नगरपालिकेच्या कचरा डेपोत दवाखान्यांतील सलाईनच्या बाटल्या, इंजेक्शन सिरिंज, काचेच्या औषधी बाटल्या येत असल्याने कचरा डेपोत काम करणाऱ्या सफाई कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे.याबाबत अखिल भारतीय सफाईगर व चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष नागेज कंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य सल्लागार जितेंद्र चव्हाण यांनी श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिले आहे.

      या निवेदनात म्हटले आहे, गेल्या काही दिवसांपासून नगरपालिकेच्या कचरा डेपोत दवाखान्यांतील सलाईनच्या बाटल्या, इंजेक्शन सिरिंज, काचेच्या औषधी बाटल्या आढळून आल्या असून या ठिकाणी सफाई कामगार काम करत असतांना कर्मचाऱ्यांच्या हाताला, पायाला, इंजेक्शनच्या सुया लागल्याने ईजा झाली आहे त्यामुळे कचरा डेपोत काम करणाऱ्या सफाई कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

      तरी नियमबाह्य कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.