शिवप्रहार न्युज - अवैध दारूवर जिल्हाभर एलसीबीची कारवाई; १०० जणांविरूद्ध गुन्हे दाखल...
अवैध दारूवर जिल्हाभर एलसीबीची कारवाई; १०० जणांविरूद्ध गुन्हे दाखल...
नगर (शिवप्रहार न्युज) - जिल्ह्यात अवैध दारु विरुध्द कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेकडून ११ लाख ३७ हजार ९६१ रूपयांचा मुद्देमाल जप्त करून १०० आरोपींना ताब्यात घेण्याची धडक कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी एलसीबीचे पोनि. दिनेश आहेर यांना नगर जिल्ह्यामध्ये हॉटेलवर विनापरवाना बेकायदा दारु विक्री करणारे इसमांविरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. त्यानुसार पोनि. आहेर यांनी एलसीबीचे पथक नेमूण जिल्ह्यामध्ये हॉटेलवर विनापरवाना बेकायदा दारु विक्री करणारे व वाहतुक करणाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्याविरुध्द कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन करुन पथके रवाना केली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी दि. ३० मार्च ते काल दि.०२ एप्रिल या कालावधीमध्ये एकूण ९५ गुन्हे दाखल करुन १०० आरोपींच्या ताब्यातून ११ लाख ३७ हजार ९६१ रूपये किंमतीची देशी विदेशी व गावठी हातभट्टीची दारु व एक स्विफ्ट कार असा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांमार्फत यापुढेही अवैध धंद्यांविरुध्द कारवाई चालु राहणार आहे.
अवैध दारु विक्री करणाऱ्या आरोपींविरूद्ध कारवाई करण्यात असून श्रीरामपूर शहर पोलिसात-१०, शिर्डी- २, नेवासा-४, सोनई-४, राहुरी- ४, आश्वी-५, लोणी-२, घारगाव-३, शेवगाव-४ यांसह विविध पोलीस ठाण्यात एकूण ९५ गुन्हे दाखल करण्यात आले असून १०० आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.