शिवप्रहार न्युज- श्रीरामपुर शहरात अवैधरित्या दारुची वाहतुक करणाऱ्या 02 आरोपीस एकुण 5,32,720/- रु. किंमतीच्या मुद्देमालासह अटक… 

शिवप्रहार न्युज-  श्रीरामपुर शहरात अवैधरित्या दारुची वाहतुक करणाऱ्या 02 आरोपीस एकुण 5,32,720/- रु. किंमतीच्या मुद्देमालासह अटक… 

श्रीरामपुर शहरात अवैधरित्या दारुची वाहतुक करणाऱ्या 02 आरोपीस एकुण 5,32,720/- रु. किंमतीच्या मुद्देमालासह अटक… 

श्रीरामपूर-

    

    अपर पोलीस अधिक्षक कार्यालय श्रीरामपूर व श्रीरामपूर शहर पोलीसांची संयुक्त कारवाई =

       सार्वत्रिक लोकसभा निवडणुक सन 2024 च्या अनुषंगाने मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, नगर व मा. वैभव कलुबर्मे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांनी अवैध दारु वाहतुक व विक्री करणारे इसमांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिल्याने अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालयातील पोहेकॉ/शंकर चौधरी, पोना/सचिन धनाड, पोना/संतोष दरेकर, पोना/ रामेश्वर वेताळ तसेच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी पोसई/ समाधान सोळंके, पोसई/दिपक मेढे, पोकॉ/राहुल नरवडे, पोकॉ/ अजित पटारे, पोकॉ/ संभाजी खरात यांचे पथक नेमुण श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दित अवैध दारु धंदयांवर कारवाई करणेकामी आदेशीत करण्यात आले.

       त्यानुसार वरील पथक श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन हददीमध्ये अवैध दारु धंदयांवर कारवाई करणे करीता पेट्रोलिंग करीत असतांना रात्री 23/00 वा.चे सुमारास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना श्रीरामपूर नेवासा जाणारे रोडवर कांदा मार्केट समोर एक विना नंबरची सिल्व्हर रंगाची मारुती स्विफ्ट डिझायर कार वेगाने नेवासा रोडकडे जाताना दिसली. सदर गाडीचा पथकास संशय आल्याने सदर गाडीस हात दाखवुन गाडी रस्त्याचे बाजुला थांबवीली. गाडी मध्ये काय आहे याबाबत चालकास विचारणा केली असता गाडीचालक व त्याचे सोबत असणाऱ्या इसमाने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी त्यास विश्वासात घेवुन त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1.करण बाबासाहेब केंदळे वय 27 रा.लक्ष्मीनगर नेवासा ता.नेवासा जि.नगर 2. मोहसीन रशीद इनामदार वय -30 रा. बाजारतळ नेवासा ता.नेवासा जि.नगर असे असल्याचे सांगितले.

         त्याचवेळी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये खालील वर्णनाचा प्रोहीबिशन गुन्ह्याचा माल विनापरवाना व बेकायदा वाहतुक करताना मिळुन आला तो पुढील प्रमाणे

1) 13,440 /-रु.किं.ची बॉबी संत्रा देशी दारुचे 4 बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये प्रत्येकी 180 मिलीच्या 48 क्वार्टर प्रत्येक क्वार्टरची किमंत 70/-रु असलेली

2)9,600/- रु.किं.ची गोवा जिन दारुचे 2 बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये 48 क्वार्टर प्रत्येकी 180 मिलीच्या प्रत्येक क्वार्टरची किमंत 100/-रु असलेली

3)9,120/- रु.किं.ची टु बर्ग बिअर चे 4 बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये 12 बाटल्या प्रत्येकी 650 मिलीच्या प्रत्येक बाटलीची किमंत 190/-रु असलेली

4) 4,560/- रु.किं.ची किंग फिशर बिअर चे 4 बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये 12 बाटल्या प्रत्येकी 650 मिलीच्या प्रत्येक बाटलीची किमंत 190/-रु असलेली

5) 8,640/- रु.किं.ची बी - 7 दारुचे 1 बॉक्स एक बॉक्समध्ये 48 क्वार्टर प्रत्येकी 180 मिलीच्या प्रत्येक क्वार्टरची किमंत 180/-रु असलेली 6) 25,920/- रु.किं.ची रॉयल स्टॅग दारुचे 3 बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये 48 क्वार्टर प्रत्येकी 180 मिलीच्या प्रत्येक क्वार्टरची किमंत 180/-रु असलेली.

7) 61,440/- रु.किं.ची इम्पिरीयल ब्ल्यु दारुचे 8 बॉक्स प्रत्येक बॉक्समध्ये 48 क्वार्टर प्रत्येकी 180 मिलीच्या प्रत्येक क्वार्टरची किमंत 160/-रु असलेली 1,32,720/- रु. कि.चा एकुण अवैध दारुचा मुददेमाल. तसेच

4,00,000/- रु.किं.ची अवैध दारु वाहतुक करण्या करीता वापरलेले स्विप्ट डिझायर कार

5,32,720/- रु. असा एकुण किं.चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

       वरील अवैध दारु वाहतुक करणाऱ्या आरोपी विरुध्द श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला पोना सचिन सिताराम धनाड, नेम अपर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं 423/2024 म.प्रोव्हि.का.कलम 65 (अ),83 प्रमाणे दि.06/04/2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

          सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, नगर व मा. वैभव कलुबर्मे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर तसेच मा.डॉ. बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, यांचे मार्गदर्शनाखाली मा. नितीन देशमुख, पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, यांचेकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, परि.पोलीस उपनिरीक्षक/दिपक मेढे, पोकॉ/ राहुल नरवडे, पोकॉ/ संभाजी खरात, पोकॉ/अजित पटारे, तसेच अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर कार्यालयातील पोहेकॉ/शंकर चौधरी, पोना/सचिन धनाड, पोना/ संतोष दरेकर, पोना/ रामेश्वर वेताळ यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.निरीक्षक समाधान सोळंके हे करीत आहेत.