शिवप्रहार न्युज - ममदापूरमधुन 44 जिवंत गोवंश जनावरे ताब्यात…

शिवप्रहार न्युज -  ममदापूरमधुन 44 जिवंत गोवंश जनावरे ताब्यात…

ममदापूरमधुन 44 जिवंत गोवंश जनावरे ताब्यात…

ममदापूर/श्रीरामपूर-नमूद बातमीची हकिगत अशी की, दिनांक 08/04/24 रोजी पोनि/श्री. दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा नगर यांना इसम नामे अक्रम कुरेशी, जब्बार कुरेशी, सद्दाम कुरेशी, रिजवान कुरेशी व फैजान कुरेशी सर्व रा. ममदापुर, ता. राहाता अशांनी काही गोवंश जातीची लहान मोठी जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने काटवनात निर्दयतेने बांधुन ठेवलेली आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/तुषार धाकराव व अंमलदार बाळासाहेब मुळीक, दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, बबन मखरे, संदीप पवार, सचिन अडबल, भिमराज खर्से, शिवाजी ढाकणे, मयुर गायकवाड, जालिंदर माने, सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे, रोहित मिसाळ, अमोल कोतकर, बाळासाहेब गुंजाळ, भाऊसाहेब काळे, विशाल तनपुरे, अमृत आढाव, उमाकांत गावडे, संभाजी कोतकर व अरुण मोरे अशांचे पथके नेमुण तसेच लोणी पोस्टेचे अधिकारी व अंमलदार यांना सोबत घेवुन बातमीतील नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना देवुन पथके रवाना केली.

 पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी ममदापुर ता. राहाता गांवातील काटवनात गोवंश जातीची लहान मोठी जनावरे निर्दयतेने बांधलेली दिसुन आली व त्यांचे जवळच काही इसम उभे असलेले दिसले. पथकाची खात्री होताच पथक संशयीतांकडे जात असताना त्यांना पोलीस पथकाची चाहुल लागताच ते काटवनात पळुन गेले. सदर पळुन गेलेले इसम व काटवानात बांधुन ठेवलेली गोवंश जनावरे यांचे बाबत आजुबाजूस विचारपुस करता सदर पळुन गेलेले इसम हे 1) अक्रम लतीफ कुरेशी (फरार), 2) जब्बार कुरेशी (फरार), 3) सद्दाम फकिर मोहम्मद कुरशी (फरार), 4) रिजवान कुरेशी (फरार) व 5) फैजान जब्बार कुरेशी (फरार) सर्व रा. ममदापुर, ता. राहाता हे असुन काटवनात बांधुन ठेवलेली जनावरे पळुन गेलेल्या इसमांच्या मालकीची आहेत व ती कत्तलीसाठी बांधुन ठेवल्याचे समजले.

 पथकाने लागलीच काटवनात बांधलेली लहान मोठी 2,01,000/- हजार रुपये किंमतीची 44 गोवंशी जनावरे ताब्यात घेवुन आरोपी विरुध्द लोणी पोलीस स्टेशन गु.र.नं. 217/2024 महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम कलम 5 (अ), (ब), 9 (ब) सह प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 3 व 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी पोलीस स्टेशन करीत आहे.

     सदरची कारवाई मा.श्री. राकेश ओला,पोलीस अधीक्षक, नगर, मा.श्री. वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, मा.श्री. शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.