शिवप्रहार न्युज - “पेताड” माणसाने घेतले श्रीरामपूर न्यायालय डोक्यावर...
“पेताड” माणसाने घेतले श्रीरामपूर न्यायालय डोक्यावर...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)- श्रीरामपुरातील जिल्हा व सत्र न्यायालयात आज बुधवार दि.३ जूलै २०२४ रोजी दुपारी एका मद्यपीने (पेताड/दारूड्याने) चांगलाच गोंधळ घातला. या मद्यपीने अनेकांना कारण नसताना शिवीगाळ करत आरडाओरडा करून न्यायालयाच्या इमारतीवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला.
या पेताड/मद्यपी माणसाला न्यायालयीन पोलीस कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर पुढील कारवाई सुरू आहे. कायम शांतता असणाऱ्या न्यायालयाच्या आवारात मद्यपी/पेताडाने गोंधळ घालुन न्यायालय डोक्यावर घेतल्याचे पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.