शिवप्रहार न्युज - खिर्डी प्रकरणावरून पोलीस व तहसीलदारांच्या निलंबनाची शक्यता असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा दावा…
खिर्डी प्रकरणावरून पोलीस व तहसीलदारांच्या निलंबनाची शक्यता असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा दावा…
श्रीरामपूर : “लव्ह जिहाद पाठोपाठ लँड जिहाद” चा प्रकार श्रीरामपूर तालुक्यात खिर्डी येथे उघड झाला असल्याचे व त्याला सहकार्य करण्याचे काम दस्तुरखुद्द पोलीस अधिकारी व तहसीलदार करत असल्याचा आरोप हिंदुत्ववादी गांवकरी करत आहे. तसेच संबंधित सदर प्रकरण विधानसभेमध्ये गाजण्याची आणि पोलीस अधिकारी व तहसीलदार यांचे निलंबन होण्याची शक्यता असल्याचे मत हिंदुत्ववादी संघटनांनी व्यक्त केले आहे.
याबाबत हिंदुत्ववादी संघटनांचे म्हणणे आहे की,श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी येथील एका गायरान जमिनीत बुधवारी मध्यरात्री मुस्लिम समाजातील एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पुरण्यात आला. सदर बाब गावातील लोकांना समजल्यानंतर गावामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिस प्रशासनाला कळताच पोलीस निरीक्षक थेट घटनास्थळी पोहोचले. त्यांनी काहीच झाले नाही असे दाखवत,बघतो, करतो आणि वेळ मारून नेली.धक्कादायक प्रकार घडला. तसेच सदर प्रकरण आमच्याकडे येत नाही.तुम्ही तहसीलदार यांना कळवा. असे सांगून येथून ते निघून गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ग्रामस्थांनी तहसील कार्यालय गाठले. सदर घडलेला प्रकार सांगितला. श्रीरामपूर येथील तहसीलदार मिलिंद वाघ यांनी ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तर देऊन ऑफिसमधून काढून दिले.घटना घडल्याच्या दुसऱ्या दिवशी सदर घटनेस भेट देऊन बैठक घेतली. गावातील शासनाची अंदाजे ३९ एकर गायरान जमिनीवर पाच एकराचे अतिक्रमण करून या पाच एकरात मुस्लीम समाजाने कंपाउंड मारून तेथे दफनभुमी सुरू केली आहे. या गावातील मुस्लीम समाजाला दफनभुमीसाठी ४८ गुंठे अधिकृतपणे जागा दिलेली असताना सुद्धा त्यांनी पाच एकराचे अतिक्रमण केले आहे.
तरी या अतिक्रमित जागेवर आत्तापर्यंत राजरोसपणे प्रशासनाच्या नाकावर टिच्चून अंदाजे ४१ मृतदेह दफन केले गेले. यातील फक्त सातच व्यक्ती गावातील आहेत. इतर ३४ मृतदेहांचा खिर्डी या गावाशी कुठलाही संबंध नाही. असा धक्कादायक प्रकार समोर आला असताना पोलिस प्रशासन आणि तहसीलदार यांनी कोणताही तपास न करता प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच तहसीलदार महाशयांनी तर अतिक्रमीत जागेवर जाऊन पाहणी केली. नंतर ग्रामपंचायत मध्ये बैठक घेतली. कोणालाही विश्वासात न घेता ४० गुंठे जागा मुस्लिम लोकांना दफन भुमिसाठी अजून द्यावी असा निर्णय स्वतःच परस्पर घेऊन टाकला. पूर्वीची ४४ गुंठे जागा असताना आणि या गावात फक्त ५ मुस्लिम समाजातील घरे असताना तहसीलदार असा अजब निर्णय देऊच तरी कसा शकतात? बाहेरील मृतदेह एवढे आले कुठून? अशी विचारणा गावकऱ्यांनी तहसीलदार यांना केल्यानंतर तहसीलदार बोलले की,”त्यामध्ये कोणीही अशी तक्रार करू शकत नाही. तो त्यांचा विषय आहे. असे अजब गजब उत्तर त्यांनी दिले.तरी यामागे तहसीलदार यांचे काही आर्थिक लागेबंधे तर नाही ना? असा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे.
तसेच तहसीलदार यांची आर्थिक चौकशी व्हावी अशी समस्त गावकऱ्यांनी सरकारकडे मागणी केली असून या संदर्भातील विषय लवकरच अधिवेशनात येणार असल्याचे त्यांचे म्हणने आहे.
तसेच या संदर्भात काही हिंदुत्ववादी संघटनांनी मृतदेह स्वतःच काढून हिंदू परंपरेने जाळणार असल्याचा इशारा गावकऱ्यांसह दिल्याचे समजते. त्यामुळे स्थानिक प्रशासन आता काय नेमका काय निर्णय घेतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.