शिवप्रहार न्युज - फसवून नेलेल्या ट्रॅक्टरचा श्रीरामपूर शहर पोलिसांनी लावला शोध...
फसवून नेलेल्या ट्रॅक्टरचा श्रीरामपूर शहर पोलिसांनी लावला शोध...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)-बेलापूर येथील खटोड यांच्या शोरुममधून फसवणूक करुन नेलेला ट्रॅक्टरचा श्रीरामपूर शहर पोलिसांनी तपास लावला आहे. सदर ट्रॅक्टर नाशिक जिल्ह्यातील येवला येथील एका शेतकऱ्याला विकण्यात आला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, ७० हजार रूपये डाऊनपेमेंट भरून बेलापूर येथील खटोड यांच्याकडून ट्रॅक्टर घेवून जाऊन नंतर राहीलेले ६ लाख १० हजार रूपये देण्यास टाळाटाळ करत फसवणूक करण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी खटोड यांच्या फिर्यादीवरुन श्रीरामपूर शहर पोलीसात आरोपी सोमनाथ रामदास खोसे, तोफीक शफीक शेख या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी शोरुममधून विश्वासघाताने फसवणूक करुन सोमनाथ रामदास खोसे, रा. बेल्हेकरवाडी, ता. नेवासा, तोफीक शरीफ शेख, रा. सोनई, ता. नेवासा या दोघांनी ट्रॅक्टर नेल्याने पारनेरमधील एका गुन्ह्यात आरोपी असलेल्या तोफीक शेख याला श्रीरामपूर शहर पोलिसांनी अटक करुन ताब्यात घेतले. त्यानंतर सोमनाथ खोसे याला देखील अटक केली. त्यानंतर तपासात या दोघा आरोपींनी फसवणूक करुन नेलेला ट्रॅक्टर नाशिक जिल्ह्यातील येवला येथील एका शेतकऱ्याला विकल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी सदरचा ट्रक्टर हस्तगत केला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पो. अधिक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोनि नितीन देशमुख, सहा.पो.नि. सुरेश आव्हाड, सफौ सुधिर हापसे, पोहेकॉ बाळासाहेब कोळपे, पोकॉ संपत बढे, भारत तमनर, ज्ञानेश्वर वाघमोडे, नंदकिशोर लोखंडे, पोना सचिन धनाड यांनी केली असून पुढील तपास पोहेकॉ बी.आर. कोळपे हे करीत आहेत.