शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात तपासणीला आलेल्या विद्यार्थीनीवर डॉक्टरने केला बलात्कार...

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपुरात तपासणीला आलेल्या विद्यार्थीनीवर डॉक्टरने केला बलात्कार...

श्रीरामपुरात तपासणीला आलेल्या विद्यार्थीनीवर डॉक्टरने केला बलात्कार...

   श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर शहरात तपासणी साठी रुग्णालयात आलेल्या विद्यार्थिनीवर डॉक्टरने लैंगिक अत्याचार केल्याने रुग्ण व नागरीकांमध्ये खळबळ उडाली आहे.

    याप्रकरणी राहाता तालुक्यातील पीडीत विद्यार्थीनिने श्रीरामपूर शहर पोलीसांत फिर्याद दिल्यावरून आरोपी डॉक्टर रविंन्द्र कुटे व रुग्णालयातील एक महिला कर्मचारी यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६४, ७४, ११५ (२), ३५ २, ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

   पिडीतेने तक्रारीत म्हटले आहे की, मुलींच्या वसतीगृहावर असतांना आजारी पडल्याने रेक्टर व मैत्रीण अशा आम्ही तिघी डॉ.कुटे हॉस्पीटल येथे गेलो. तेथे कर्मचारी महिलेने तरुणीला ओपीडीत नेले तेथे डॉ.रविंन्द्र कुटे आले त्यानी विचारपूस केली व झोपण्यास सांगीतले तेव्हा डॉ. कुटे याने तपासतांना नको त्या ठिकाणी हात लावून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून लैंगीक अत्याचार केला. तेव्हा मैत्रीण व रेक्टर मदतीला आल्या असता तेथील कर्मचारी महिलेने व डॉक्टर कुटेने शिवीगाळ केली व झाडूने मारले. यावेळी पिडीता व तिच्या बरोबरील दोघी प्रचंड घाबरून गेल्या. 

   याप्रकरणी पोनि.नितिन देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता डॉ.कुटे याचेवर जबरी संभोगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध पोसई.मगरे हे घेत आसल्याचे त्यांनी सांगितले. नगर शहरातील सुरभी हॉस्पीटल मधील आयसीयुतील रुग्णाला डॉक्टरने मारहाण केल्याचा प्रकार ताजा असताना आता श्रीरामपूर शहरातील नेवासारोड वरील डॉ.कुटे हॉस्पीटल मध्ये विद्यार्थिनीवर लैंगीक अत्याचाराचा प्रकार घडल्याने नागरीकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.