शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात उभारले जाणार १४.५ कोटीचे बस स्थानक…

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपुरात उभारले जाणार १४.५ कोटीचे बस स्थानक…

श्रीरामपुरात उभारले जाणार १४.५ कोटीचे बस स्थानक…

श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज) राज्य सरकारने श्रीरामपूर शहराचे एसटी बस स्थानक व आगार यांच्या नवीन बांधकामासाठी १४ कोटी ५० लाख ५९ हजार ८४० रुपये मंजूर केले आहे.काल दिनांक २० ऑगस्ट रोजी शासनाने याबाबतचे पत्र जारी केले आहे. 

        आता या मोठा निधीच्या तरतुदीमुळे श्रीरामपूर एसटी बसस्थानक भव्य-दिव्य स्वरुपात नव्याने होणार असून ते जिल्हा लेवलसारखे स्थानक असेल. शिवस्मारकासह जिल्हा होण्यासाठी श्रीरामपूर जिल्हा कृती समिती व “शिवप्रहार”चे बेमुदत धरणे आंदोलन शहरातील बेलापूररोड,बजरंगनगर येथे सुरु असून त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने हा निधी मंजूर केल्याचे पत्र जारी केल्याने सर्वांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.तरी सरकारने आता श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा अशी जनतेची तीव्र मागणी आहे .