शिवप्रहार न्युज - शिवस्मारकासह श्रीरामपूर जिल्हा आंदोलनाला शेकडो मान्यवरांचा पाठिंबा; आज ०७ व्या दिवशीही आंदोलन जोमात सुरु…

शिवप्रहार न्युज -  शिवस्मारकासह श्रीरामपूर जिल्हा आंदोलनाला शेकडो मान्यवरांचा पाठिंबा; आज ०७ व्या दिवशीही आंदोलन जोमात सुरु…

शिवस्मारकासह श्रीरामपूर जिल्हा आंदोलनाला शेकडो मान्यवरांचा पाठिंबा; आज ०७ व्या दिवशीही आंदोलन जोमात सुरु…

श्रीरामपूर - श्रीरामपूर जिल्हा कृती समिती व "शिवप्रहार"च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवस्मारकासह "श्रीरामपूर जिल्हा" व्हावा या मागणी करताच्या साखळी उपोषण आंदोलनाचा आज ०७ दिवस आहे.सर्वसामान्य श्रीरामपूरकर व शिवभक्तांसह शेकडो मान्यवरांचा पाठिंबा मिळत असल्याने आंदोलन जोमात सुरु आहे.

        काल दि.२१ ॲागस्ट २०२४ रोजी ०६ व्या दिवशी श्रीरामपूर मर्चंट असोसिएशनचे सुनील गुप्ता,पुरुषोत्तम झंवर,दत्तात्रय धालपे,मुकेश कोठारी,प्रवीण गुलाटी,निलेश बोरावके, निलेश नागले ,बाळासाहेब कासलीवाल,गौतम उपाध्ये, अनिल लुल्ला,बाळासाहेब खाबिया, प्रेमचंद कुंकुळूल,धर्मेश शहा,शांतीलाल पोरवाल,राजेंद्र कांबळे बेलापूर मर्चंट असोसिएशनचे प्रशांतजी लड्डा,बेलापूर किराणा मर्चंट असोसिएशनचे शांतीलाल हिरण, दिलीप दायमा ,श्रीरामपूर भाजपचे मा.शहराध्यक्ष मारुती बिंगले,भाजपचे मा.नगरसेवक गणेश राठी यांनी भेट देवुन पाठिंबा दिला.

         तर सायंकाळच्या सुमारास काँग्रेसचे अशोकनाना कानडे यांच्यासह वळदगावचे सरपंच अशोकराव भोसले, मुठेवडगावचे सरपंच सागर मुठे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पवार, खानापूरचे उपसरपंच अमोल अदिक, भामाठाणचे हरिभाऊ बनसोडे, माळवडगावचे विठ्ठलराव आसने,आशिष शिंदे,दिपक कदम,आदिवासी भिल्ल जनआंदोलन समितीचे प्रमुख कैलासभाऊ माळी यांनी आदिवासी बांधवांसह येऊन पाठिंबा दिला.तसेच शिरसगावचे अण्णासाहेब गवारे पा.,अण्णासाहेब फरगडे पाटील, लक्ष्मण लबडे पाटील,मोरगे पाटील फाउंडेशनचे राजेंद्र मोरगे, ऋषिकेश मोरगे,विश्व हिंदू परिषदेचे नेवासाचे प्रमुख प्रशांत बहिरट,शिंपी समाज बांधव संघटनेचे नरेंद्र लचके, दीपक चांडवले,तेजस गायकवाड

सुहास भांबरे,कैलास खंदारे,सचिन शिंदे,शहरातील प्रसिद्ध दंतरोगतज्ज्ञ डॅा.अजित घोगरे,उद्धव तांबोळी,विनोद पाटणी अदींनी प्रत्यक्ष पाठिंबा दिला.

        तसेच वळदगाव ग्रामपंचायत, वळदगाव सोसायटीचे रामराव शेटे,अशोक भोसले,एडवोकेट मधुकर भोसले, अमोल भोसले ,साहेबराव भोसले ,जगन्नाथ भोसले,राजेश राठी, दत्तात्रय तांबे, महेश रावसाहेब बोंबले, नामदेव सुलताने,लक्ष्मण ढाकणे,राजकेशर यादव,जगन्नाथ भोसले, कमालपूर ग्रामपंचायतचे सचिन मुरकुटे,सोसायटीचे गणेश लबडे तसेच ज्येष्ठ नागरिक संघटनेचे लक्ष्मण निकम,जानराव नामदेव,पेन्शनर संघटनेचे सुभाष लिंगायत,नरसाळीचे अशोक काळे, बेलापूरचे प्रसाद उर्फ पप्पू खरात पाटील,हॅाटेल प्रशांत चे मालक प्रशांत देशमुख,हॅाटेल संजोगचे अफसर शेख अदींनी प्रत्यक्ष भेट देवून पाठिंबा दिला.

       आज दि.२२ ॲागस्ट २०२४ रोजी आंदोलनाचा ०७ वा दिवस आहे.शासनाकडुन आमच्या मागण्यांबाबत ठोस कृतीशील कार्यवाही होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याचे श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष तथा शिर्डी संस्थान चे मा.विश्वस्त प्रतापनाना भोसले व शिवप्रहारप्रमुख माजी PSI सुरजभाई आगे यांनी सांगितले.