शिवप्रहार न्युज - तहसिलदार,सहाय्यक निबंधक यांच्या आश्वासनानंतर आमरण उपोषण स्थगित...

शिवप्रहार न्युज -  तहसिलदार,सहाय्यक निबंधक यांच्या आश्वासनानंतर आमरण उपोषण स्थगित...

तहसिलदार,सहाय्यक निबंधक यांच्या आश्वासनानंतर आमरण उपोषण स्थगित...

श्रीरामपूर[प्रतिनिधी]तहसीलदार श्रीरामपूर मिलिंदकुमार वाघ,सहाय्यक निबंधक संजय रुद्राक्ष,उद्योजक अशोकनाना कानडे आदींच्या मध्यस्थीने बेमुदत आमरण उपोषण स्थगित करण्यात आल्याचे नय्युम शेख,श्रीमती शितल गोरे यांनी सांगितले.लोकनायक बच्चूभाऊ कडू प्रतिष्ठान व जामखेड तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दि १६ ऑगस्ट रोजी श्रीरामपूर येथे महात्मागांधी पुतळ्यासमोर अंबिका महिला पतसंस्थेच्या मनमानी कारभार विरोधात प्रहार जनशक्ती पक्ष जामखेड तालुका अध्यक्ष शेख नय्युम शब्बीर[सुभेदार] यांच्या नेतृत्वाखाली व जिल्ह्याचे प्रहारचे सामाजिक कार्यकर्ते व चंदन रमेश मुथ्था,श्रीमती शीतल भाऊसाहेब गोरे,उत्तर महाराष्ट्र प्रमुख राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष सौ रमाताई भालेराव,परवीन निस्सार शहा,,पत्रकार अनिताताई तडके, आदीनी आमरण उपोषणास दि १६ ऑगस्ट पासून डॉ बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून प्रारंभ केला.

         शेवगाव,पाथर्डी,जामखेड,राहुरी अकोले संगमनेर,आदी ठिकाणाहून सामाजिक कार्यकर्ते यांनी येथे येऊन पाठींबा दिला व मनोगत व्यक्त केले.सत्याला साथ व अन्यायाला लाथ हे ब्रीद वाक्य घेऊन कार्यकर्ते उपोषणास बसले होते.श्रीरामपूर येथील अंबिका महिला पतसंस्थेकडून इतर बँकेचे कर्ज असताना लाखो रुपयाचे नियमबाह्य कर्ज देणे, त्यावर व्यवस्थापकांच्या सह्या नसणे,सोने तारण लिलाव करताना खातेदारास सूचना न देणे, वार्षिक सभेस खातेदारांना न बोलावणे,सभा तातडीने आटोपती घेणे,खातेदारांना वेळेवर हिशोब न देणे,रक्कम घेण्यासाठी हेलपाटे मारणे,अशा अनेक खातेदारांची तक्रारीची दखल घेऊन अंबिका महिला पतसंस्थेविरोधात बेमुदत आमरण उपोषण सुरु केले होते.या उपोषणास राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष प्रदेश सचिव विद्याताई गाडेकर,माजी सभापती वंदनाताई मुरकुटे,अशोकनाना कानडे,उद्योजक,गणेश राठी,शहर संघटक रा.कॉंग्रेस लकी शेठी,प्रहारचे लक्ष्मण खडके,भीमशक्ती संघटना संदीप मगर,रितेश एडके,विजय पाठक,तालुकाध्यक्ष संजय गांधी नि. यो.गणेशराव मुदगुले,विजया बारसे,भारती वाणी, पार्वताबाई गायकवाड,लता वानखेडे,असिफ पठाण,कैलास राजळे,रामा गवळी,कैलास घुमारे,ललिता मांडे,अमोल अत्रे,कणगरे,सुहास वेताळ,कांबळे,शेख रफिक,हरिभाऊ राजळे,चव्हाण,आदींनी उपोषणास पाठींबा दिला.

      तरी ३० ऑगस्ट पर्यंत याबाबत चौकशी करून कारवाई करण्याचे लेखी आश्वासन तहसीलदार, सहाय्यक निबंधक यांनी दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले आहे.