शिवप्रहार न्यूज -नामदार प्राजक्तदादा तनपुरे यांच्या हस्ते ०५ रुग्णवाहिकांचे लोकार्पण...
नामदार प्राजक्तदादा तनपुरे यांच्या हस्ते ०५ रुग्णवाहिकांचे लोकार्पण...
राहुरी/शहर प्रतिनिधी- महाराष्ट्र शासनाच्या 14 व्या वित्त आयोगाच्या पैशाच्या व्याजातून महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पंचेचाळीस रुग्णवाहिका मंजूर केल्या. त्यात राहुरी तालुक्यासाठी पाच रुग्णवाहिका मिळाल्या असून राज्यमंत्री प्राजक्त दादा तनपुरे यांच्या हस्ते यांच्या वितरण समारंभ पंचायत समिती,राहुरी येथे पार पडला .याप्रसंगी पंचायत समिती सभापती सौ बेबीताई सोडणार,सौ मनीषाताई ओहोळ,सुरेश निमसे पाटील आरोग्य अधिकारी डॉक्टर गायकवाड, प्रदीप पवार, बाळासाहेब सोडणार,पंचायत समिती सदस्य, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष संतोष आघाव यांच्यासह शेतकरी मराठा महासंघाचे संभाजीराव दहातोंडे तसेच ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी व प्रत्येक विभागाचे आरोग्य सेवक उपस्थित होते.
गुहा ,उंबरे, बारागाव नांदूर सह सर्व आरोग्य केंद्रांना शासनाच्या अनुदानातून प्राप्त झालेले रुग्णवाहिका नामदार तनपुरे यांच्या हस्तेवितरीत करण्यात आल्या. त्यामुळे पूर्वी 108 या नंबर वर फोन केल्यानंतर मांजरी सारख्या ठिकाणी रुग्णवाहिका पोहचण्यासाठी दीड ते दोन तास लागत होता.त्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होत होते. परंतु आता प्रत्येक आरोग्य केंद्रावर ही रुग्णवाहिका उपस्थित असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होणार नाही.वेळप्रसंगी रुग्णांना इतरत्र मोठ्या दवाखान्यात हलवताना सुद्धा या रुग्णवाहिकेचा उपयोग होणार आहे असे तनपुरे यांनी सांगितले. covid-19 च्या काळात वांबोरी येथील तीस ऑक्सिजनचे बेडचे येत्या काळात विस्तारीकरण करून ते लवकरच 100 बेडच्या सुसज्ज ऑक्सीजन सह सर्व सुविधा परिपूर्ण करण्याचे काम सुरू आहे.
राहुरी येथील बालाजी मंदिर मधील कोडीड सेंटर येथे अनेक रुग्णांना चांगल्या प्रकारच्या सुविधा पुरवल्या याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.तालुक्यातील रुग्णांच्या संख्येत झपाट्याने घट होत असून ती आता दोन अंकावर आल्याचे दिसून येत आहे.याकामी तहसीलदार शेख ,पी आय दुधाळ तसेच आरोग्य अधिकारी डॉक्टर गायकवाड ,राहुरी नगरपालिकेचे आरोग्य यंत्रणा व प्रत्येक आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांसह सर्व आरोग्य सेविका व सेवक यांचं मोलाचं योगदान असल्याचे त्यांनी आवर्जून सांगून त्यांच्या कार्याबद्दल त्यांची प्रशंसा केली.
लवकरच सर्व क्षेत्रातील या सामूहिक प्रयत्नाने संख्या शून्यावर यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.सूत्रसंचालन उपसभापती रवींद्र आढाव यांनी केले तर आभार बाळासाहेब लटके यांनी मानले.