शिवप्रहार न्युज - गणपती आगमनदिनी फोटोग्राफर असोसिएशनसह वडाळा,नायगाव ग्रामपंचायतच्या वतीने आंदोलनास पाठिंबा...
गणपती आगमनदिनी फोटोग्राफर असोसिएशनसह वडाळा,नायगाव ग्रामपंचायतच्या वतीने आंदोलनास पाठिंबा...
श्रीरामपूर -हिंदुस्थानातील प्रभू श्रीरामांच्या नावाने पहिला असा “श्रीरामपूर जिल्हा” घोषित करावा व छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांचा पुतळा व्हावा या मुख्य मागण्यांसाठी श्रीरामपूर जिल्हा कृती समिती व शिवप्रहारच्या माध्यमातुन चालू असलेल्या बेमुदत साखळी उपोषण आंदोलनास आज शनिवार दि.०७ सप्टेंबर २०२४ रोजी आंदोलनाच्या २३ व्या दिवशी म्हणजेच श्री.गणेश चतुर्थी गणपती आगमनच्या दिवशी श्रीरामपूर तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने लेखी पाठिंबा पत्र देण्यात आले.यावेळी अमितराज आहेर,सचिन पतंगे,आतिश देसर्डा,रोहित साबळे,अमोल कदम,अनिल पांडे,विलास लबडे,संतोष देसाई,सुशील रांका,संजय अलघ,अक्षय कुमावत,सचिन परदेशी,गौरव शेटे,सचिन पतंगे,भानुदास बेरड इत्यादी उपस्थितीत होते.
तसेच वडाळा महादेव ग्रामपंचायत व नायगाव ग्रामपंचायतच्या वतीने लेखी पत्र देऊन पाठिंबा देण्यात आला.यावेळी सुनील पवार,विजय उघडे,सचिन पवार,क्षितिष पवार,भरत पवार,अरुण पवार,सुजित राठोड,पंकज पवार,महेश जाधव,तसेच मराठा महासंघाचे श्रीरामपूर तालुक्याचे दिलीप मारुती पाटील थोरात यांच्यासह प्रशांत राशिनकर,पंकज दरेकर,कृष्णा रोडे,श्रीनाथ कांबळे,सखाहरी गायकवाड इत्यादी उपस्थित होते.
आजच सायंकाळच्या सुमारास श्रीरामपूर शहरातील अंध शाळेचे जनक, ज्येष्ठ वकील ॲड.भागचंद चुडीवाल व दै.नवा मराठाचे ज्येष्ठ पत्रकार श्री.रमणजी मुथ्था यांनीही प्रत्यक्ष येऊन पाठिंबा दिला.