शिवप्रहार न्युज - पंजाबच्या ०६ खुंकार आरोपींना संभाजीनगरमध्ये पकडले…

शिवप्रहार न्युज -  पंजाबच्या ०६ खुंकार आरोपींना संभाजीनगरमध्ये पकडले…

पंजाबच्या ०६ खुंकार आरोपींना संभाजीनगरमध्ये पकडले…

छ.संभाजीनगर- काल छत्रपती संभाजीनगरच्या (CSN) पोलिसांनी एक धाडसी आणि जबरदस्त कारवाई करून संपूर्ण देशात नावलौकिक कमावला आहे.फीरोजपूर, पंजाब येथील तिहेरी हत्याकांडात सामील असलेल्या ०६ अत्यंत धोकादायक आरोपींना अटक करण्यात आली. या धक्कादायक घटनेत एका तरुण महिलेची, जिचे लग्न अवघ्या काही दिवसांवर आले होते तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. शस्त्रांनी सुसज्ज असलेले हे आरोपी वाऱ्याच्या वेगाने महाराष्ट्रात पळत होते. पण, नशिबाने या आरोपींना छत्रपती संभाजीनगरच्या शूर पोलिस दलाच्या हातातून सुटणे अशक्य होते!

       याबाबत अधिक माहिती अशी कि,काल पहाटे ३:०० वाजता अचानकच मा श्री प्रविण पवार ,पोलीस आयुक्त यांचे मोबाइलवर पंजाब पोलिसांच्या AGTF चे ADG श्री प्रमोद बान यांचा फोन आला. अत्यंत गंभीर प्रकरणी तातडीची मदत हवी होती. त्यांचे शब्द थरारक होते.क्षणाचाही विलंब न करता पोलीस दलाने सर्व तयारी केली आणि आरोपींचा मागोवा सुरू झाला. संभाजीनगरजवळ MH26AC5599 क्रमांकाची इनोव्हाआरोपींनी भरधाव वेगाने पळवली! पण समृद्धी महामार्गावरून पळणाऱ्या त्या गाडीला सकाळी ५:४५ वाजता छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी चक्रव्यूहात अडकवले! अत्यंत धाडसी योजना आखून PI क्राईम ब्रांच श्री.संदीप गुरमे आणि CIDCO चे PI श्री.गजानन कल्याणकर यांच्या नेतृत्वाखालील १० अधिकाऱ्यांच्या आणि ४० कर्मचाऱ्यांच्या टीमने, QRT सह सज्ज होऊन, आरोपींना शस्त्रांनी सुसज्ज असतानाही त्यांच्या हिशोबाने घेरले. बुलेटप्रूफ जॅकेट्समध्ये सज्ज पोलीस जवानांनी जणू एक रणांगणच सजवलं होतं! गोळ्या कधीही सुटू शकल्या असत्या पण पोलिस अत्यंत दक्ष होते.ही कारवाई जणू एखाद्या चित्रपटातली थरारक घटना वाटावी अशीच होती.श्वास रोखून धरावा लागेल अशी ती धाडसी मोहीम.या शूर पोलिसांनी सातही आरोपींना पळ काढण्याआधीच ताब्यात घेतलं आहे.

      संभाजीनगर पोलीसांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.