शिवप्रहार न्यूज-जिल्ह्यात प्रथमच महिला “प्रधान जिल्हा न्यायाधीशपदी”विराजमान तसेच शिर्डी संस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्षपदही त्यांच्याकडेच …
जिल्ह्यात प्रथमच महिला “प्रधान जिल्हा न्यायाधीशपदी”विराजमान तसेच शिर्डी संस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्षपदही त्यांच्याकडेच …
नगर- नगर जिल्ह्याच्या प्रधान जिल्हा न्यायाधीशपदी पहिल्यांदाच महिला न्यायाधीशाची नेमणूक झाली आहे.नगरचे प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर येरालगड्डा यांची अमरावती येथे बदली झाली.त्यांच्या जागी धाराशिव येथील श्रीमती अंजू एस.शेंडे यांची बदली झाली आहे.
नगरच्या २०० वर्षाच्या जिल्हा न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रधान जिल्हा न्यायाधीशपदी महिलेची नियुक्ती झाली आहे. दि.१८ सप्टेंबरनंतर त्या सूत्रे स्वीकारतील अशी माहिती आहे.
प्रधान जिल्हा न्यायाधीशपदासोबतच त्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्त समितीच्याही अध्यक्ष असतील.