शिवप्रहार न्युज - राहुरीचे मा.आमदार चंद्रशेखर कदम यांचा शिवस्मारकासह जिल्हा आंदोलनास पाठिंबा ...

शिवप्रहार न्युज - राहुरीचे मा.आमदार चंद्रशेखर कदम यांचा शिवस्मारकासह जिल्हा आंदोलनास पाठिंबा ...

राहुरीचे मा.आमदार चंद्रशेखर कदम यांचा शिवस्मारकासह जिल्हा आंदोलनास पाठिंबा ...

श्रीरामपूर -हिंदुस्थानातील प्रभू श्रीरामांच्या नावाने पहिला असा “श्रीरामपूर जिल्हा” घोषित करावा व छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांचा पुतळा व्हावा या मुख्य मागण्यांसाठी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष प्रतापनाना भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व "शिवप्रहार"च्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या बेमुदत साखळी उपोषण आंदोलनास काल गुरुवार दि.१९ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी राहुरीचे मा.आमदार तथा शिर्डी संस्थानचे मा.उपाध्यक्ष चंद्रशेखरभाऊ कदम पाटील यांनी त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांसह भेट दिली.

       तसेच वरील दोन्ही मागण्यांना त्यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी शिवप्रहारप्रमुख,माजी पोलीस अधिकारी श्री.सुरजभाई आगे,कार्याध्यक्ष श्री.चंद्रशेखर(चंदू)आगे यांना सांगितले.दरम्यान आज शुक्रवार दि.२० सप्टेंबर रोजी या साखळी उपोषण आंदोलनाचा तब्बल ३६ वा दिवस आहे.