शिवप्रहार न्युज - बलात्कारी बापाला १२ वर्षांची शिक्षा...
बलात्कारी बापाला १२ वर्षांची शिक्षा...
संगमनेर-येथे जन्मदात्या बापानेच स्वतःच्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते.त्यानुसार पिडीता गर्भवती राहिली होती. ही घटना संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या प्रकरणी १९ ऑक्टोबर २०२२ ला गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान या प्रकरणावर सुनावणी होऊन मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला न्यायालयाने १२ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा आणि २५ हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली आहे.काल गुरुवारी (दि. १९) तसा निकाल येथील अतिरिक्त सहजिल्हा न्यायालय व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिली.