शिवप्रहार न्युज - आमदार लहू कानडे राष्ट्रवादीमध्ये;श्रीरामपुरात काँग्रेसला खिंडार...

शिवप्रहार न्युज -  आमदार लहू कानडे राष्ट्रवादीमध्ये;श्रीरामपुरात काँग्रेसला खिंडार...

आमदार लहू कानडे राष्ट्रवादीमध्ये;श्रीरामपुरात काँग्रेसला खिंडार...

श्रीरामपूर- श्रीरामपूरचे विद्यमान आमदार लहू कानडे यांनी तिकीट नाकारल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षात प्रवेश केला आहे.काँग्रेस पक्षामध्ये असलेले आमदार कानडे यांना तिकिटाची अपेक्षा होती.परंतु विधानसभेसाठी त्यांचे तिकीट कापून हेमंत ओगले यांना उमेदवारी मिळाल्यामुळे नाराज कानडेंनी राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षात प्रवेश केला आहे.

        दरम्यान अशी माहिती मिळत आहे की,महायुतीकडून राष्ट्रवादी अजितदादा पक्षातर्फे लहू कानडे हे श्रीरामपूर विधानसभेची उमेदवारी करणार आहे.तसेच माजी नगराध्यक्ष अनुराधा अदिक यांच्या कार्यालयाच्या बाहेर फटाके देखील फोडण्यात आले.त्यावरून त्यांची उमेदवारी फायनल झाली असे बोलले जात आहे.