शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर विधानसभेसाठी राजाभाऊ कापसे मनसेचे उमेदवार...

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपूर विधानसभेसाठी राजाभाऊ कापसे मनसेचे उमेदवार...

श्रीरामपूर विधानसभेसाठी राजाभाऊ कापसे मनसेचे उमेदवार...

 श्रीरामपूर - श्रीरामपूर या राखीव विधानसभा मतदारसंघासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राजाभाऊ कापसे यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे अशी माहिती सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

      रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते राजाभाऊ कापसे यांनी 2009 साली श्रीरामपूर विधानसभेची निवडणूक लढवून मोठे मतदान मिळवले होते.आता पुन्हा मनसेच्या वतीने उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांनी नुकतीच मुंबईत भेट घेतली.