शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर माहेर असलेली सून व नातेवाईकांच्या छळाला कंटाळून सासऱ्याची आत्महत्या… 

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपूर माहेर असलेली सून व नातेवाईकांच्या छळाला कंटाळून सासऱ्याची आत्महत्या… 

श्रीरामपूर माहेर असलेली सून व नातेवाईकांच्या छळाला कंटाळून सासऱ्याची आत्महत्या… 

राहुरी- सन 2016साली बँकेतून सेवानिवृत्त झालेल्या सासऱ्याचे रिटायरमेंटचे पैसे आपल्या नावावर करावे तसेच एक एकर जमीन आपल्या नावावर करावी या मागणीसाठी सून व तिच्या नातेवाईकांनी खोटा गुन्हा दाखल केल्यामुळे या त्रासाला वैतागून नैराश्यग्रस्त झालेल्या भाऊसाहेब ब्राह्मणे, रा- चिंचोली फाटा,तालुका राहुरी यांनी स्वतःची जीवन यात्रा संपवली. 

        याबाबत त्याची पत्नी लताबाई ब्राह्मणे रा- चिंचोली फाटा,तालुका राहुरी यांच्या फिर्यादीवरून सून वर्षा ब्राह्मणे/ओहोळ हिच्यासह तिचे नातेवाईक चंद्रकांत ओहोळ,राजेंद्र भोसले,राहणार-श्रीरामपूर व सुनील ब्राह्मणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मयताने आत्महत्या करताना एक चिठ्ठी लिहीली असून त्यामध्ये वरील आरोपींची नावे आहे.राहुरी पोलीसांकडून पुढील तपास चालू आहे.