शिवप्रहार न्युज - अशोक कारखान्यात ठेकेदारी करणारे पारखे यांची रेल्वेखाली आत्महत्या ? खळबळ!! 

शिवप्रहार न्युज -  अशोक कारखान्यात ठेकेदारी करणारे पारखे यांची रेल्वेखाली आत्महत्या ? खळबळ!! 

अशोक कारखान्यात ठेकेदारी करणारे पारखे यांची रेल्वेखाली आत्महत्या ? खळबळ!! 

अशोकनगर ( शिवप्रहार न्युज) अशोक सहकारी साखर कारखान्यात ठेकेदारी करणारे जालींदर पारखे यांचा आज शुक्रवारी सायंकाळी काहीवेळापूर्वी रेल्वे रुळावर मृतदेह आढळून आला.या दुःखद घटनेने खळबळ उडाली असून जालींदर पारखे यांनी आत्महत्या केली का ? त्याचे काय कारण ? नेमका प्रकार कोणत्या वेळी घडला ? नेमका काय प्रकार आहे? अशी चर्चा सुरु आहे.

        श्री.पारखे हे अतिषय कष्टाळू वृत्तीचे होते मग त्यांनी नेमकी रेल्वे रुळावर आत्महत्या केली असेल तर त्याचे कारण काय? याची चौकशी आता अकस्मात मृत्युची नोंद झाल्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चालू झाली आहे.पारखे यांच्या अकस्मात मृत्युमुळे हळहळ व्यक्त होत आहे .